घरातून बाहेर पडताना कोणता पाय आधी बाहेर ठेवावा? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला खूप अशी माहिती प्राप्त होते. त्याचा आपल्या जीवनामध्ये खूपच फायदा होत असतो. म्हणजेच आपण शास्त्रामध्ये सांगितलेले अनेक उपाय देखील करून जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकतो. बऱ्याच लोकांना भरपूर प्रयत्न करून देखील यश प्राप्त होत नाही आणि काही ना काही अडचणी या येतच राहतात. त्यासाठी देखील अनेक प्रकारचे उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत.

तर आज मी तुम्हाला घरातून बाहेर पडताना नेमका कोणता पाय आधी बाहेर ठेवायचा आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त जर घराबाहेर पडणार असाल तर तुम्ही जर चुकीचा पाय आधी बाहेर ठेवला तर यामुळे त्या कामांमध्ये तुमचे नुकसान होणार आहे. त्यामध्ये यश अजिबात प्राप्त होणार नाही.

तर आधी कोणता पाय बाहेर ठेवायचा आहे हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. कारण यामुळे मग आपल्याला त्या कामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्या कामांमध्ये आपणाला यशच प्राप्त होईल. तर ज्या वेळेस तुम्ही घरातून बाहेर जात असता त्यावेळेस उजवा पाय आधी बाहेर ठेवल्याने आपणाला त्या कामांमध्ये नक्कीच यश मिळते असे आपले वडीलधारे लोक सांगितलेले आपण ऐकले असेल.

तसेच सामुद्रिक शास्त्रामध्ये देखील असे सांगितले आहे की, जर तुम्ही कोणत्याही शुभ कामासाठी जेव्हा घराबाहेर जात असाल त्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडताना पहिला उजवा पाय बाहेर टाकायचा आहे. जर तुम्ही उजवा पाय बाहेर टाकला तरी यामुळे तुमची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण निर्माण होत नाही.

त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता त्यावेळेस देखील तुम्ही उजवा पाय आधी घरात टाकणे शुभ मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये तसेच तुम्ही पाहिले असेल की जेव्हा घरामध्ये एखादे लग्नकार्य असते त्यावेळेस जेव्हा वधू घरामध्ये प्रवेश करीत असते त्यावेळेस त्या वधूला उजवा पाय घरामध्ये ठेवण्यास सांगतात. म्हणजेच उजव्या पायाने घरामध्ये प्रवेश करायला सांगतात.

तसेच तुम्ही अनेक पूजा विधिमध्ये देखील पाहिले असेल की ज्या वेळेस पूजा करतात त्यावेळेस उजव्या हाताचा वापर केला जातो. त्याप्रमाणेच घराबाहेर जाताना उजवा पाय बाहेर ठेवने शुभ मानले गेलेले आहे आणि डावा पाय जर तुम्ही ठेवला तर तुमचे ते काम अपूर्ण राहते. म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही.

म्हणजेच डावा पाय हा नकारात्मकतेचे लक्षण मानला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामानिमित्त, एखादे शुभ कार्य करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर तुम्ही नेहमी घराबाहेर उजवा पाय पहिल्यांदा ठेवायचा आहे. तसेच घरामध्ये प्रवेश करताना देखील तुम्ही उजवा पाय अगोदर टाकायचा आहे आणि हेच आपल्यासाठी खूपच शुभ असते. तर या गोष्टींकडे तुम्ही अवश्य लक्ष द्या आणि घराबाहेर पडताना तसेच घरामध्ये प्रवेश करताना तुम्ही उजवा पायच पहिल्यांदा ठेवायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *