घरात लावा असे पडदे, परिणाम पहा !

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

मित्रांनो आपल्या घराला सुशोभित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कलरचे पडदे लावत असतो. ते पडदे आपण डिझाईनचे देखिल आनत असतो.व त्याच्यावर वेगवेगळ्या कलरचे डिझाईन देखील असतात.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या प्रकारचे पडदे लावल्यामुळे काय लाभ होतो हे देखील सांगण्यात आलेल आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने आपल्या आवडीचे कलर चें पडदे घरांमध्ये लावत असाल तर ते तुमच्या साठी चांगलं नाही.

कारण वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या घरासाठी कोणत्या कलरचे पडदे चांगले आहेत हे देखील सांगण्यात आलेले आहेत.चला तर मित्रांनो आता आपण कोणत्या घरामध्ये कोणत्या कलरचे पडदे लावायचे व त्याच्याने काय लाभ होतो याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहे की घरामध्ये जे काही वस्तू आहे त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात आणि याचा परिणाम घरात राहणाऱ्या व्यक्तींना होत असतो.

वास्तुशास्त्रामध्ये पडद्यां बद्दलचे काही नियम देखील सांगण्यात आलेले आहेत. जर तुम्ही हे नियम नाही पाळला तर त्याचे तुम्हाला खूप नुकसान देखील होणार आहे. सर्वात पहिला येते ती म्हणजे ड्रॉइंग रूमचे पडदे ड्रॉइंग रूमचे पडदे किंवा पाहुण्यांसाठी जर वेगळी रूम असेल.

तर त्याच्यासाठी तुम्हाला गडद किंवा क्रीम कलर चे पडदे लावायचे आहेत हे पडदे लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते .घरातील प्रमुख व्यक्ती किंवा घरातील प्रमुख माणूस जो आहे.

त्यांच्या रूममध्ये खिडकी आणि दरवाजांना निळ्या कलरची पडदे लावायचे आहेत किंवा तपकिरी लावला तरी देखील चालू शकते त्याचबरोबर जर केसरी लावला तरी देखील त्यातूनच ठरणार आहे त्याच्यामुळे जे घरचे प्रमुख व्यक्ती आहेत.

त्यांचे आरोग्य हे नेहमी चांगले राहणार आहे याच्यामुळे संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील राहते आणि या रंगाच्या प्रभावामुळे घरामधील सर्व सदस्यांची प्रगती देखील होते असं वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलेले आहे.

बेडरूमला तुम्ही जर तुमचं आता नुकताच लग्न झाले असेल तर पडद्यांचा रंग निवडण्या कडे तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे म्हणजेच की पती-पत्नीने त्यांच्या रूममध्ये लाल जांभळा किंवा गुलाबी रंगाचे पडदे लावायचे आहेत.

किंवा त्या शेडमध्ये पडदे लावला तरी देखील चालू शकते त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये नवीन असे ऊर्जा येणार आहे आणि पती-पत्नीमध्ये प्रेम देखील वाढतो.मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये देखील तुम्हाला हिरवे निळे किंवा गुलाबी कलरचे पडदे लावायचे आहेत.

हे रंग शांती आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते अभ्यासिका जर असेल तर हिरव्या कलरचे पडदे लावल्यावर ते अतिउत्तम ठरते आणि त्यांचे मन देखील अभ्यासामध्ये गुंतून राहते आणि जर तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की आमच्या घरांमध्ये मुलांना अभ्यासाला वेगळी रूम अशी नाही.

आमचं घर छोटस आहे ज्या ठिकाणी मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी एखादी लहान खिडकी जरी असेल तर खिडकी लावला तरी देखील चालते.देवघरांमध्ये देखील खिडकी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला केशरी किंवा हलका पिवळ्या कलरचा पडदा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे.

हे दोन्ही रंग पवित्र आहेत असे मानले जाते या कलरचे पडदे लावल्यामुळे संपूर्ण घरामध्ये पवित्रतेचे वातावरण तयार होते. घरामध्ये शांतता टिकवण्यासाठी तुम्हाला विशेष असे पडदे निवडायचे आहेत.

त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कलर कधीही निवडू नये जर तुम्ही तसं केला तर तुमच्या घरामध्ये मतभेद वाढू शकतात किंवा एकमेकांचे पटत देखील नाही घरामध्ये वारंवार वाद होईल लागतात. तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला लाल कलर चा पडदा लावायचा आहे.

त्यामुळे तुमच्या घरातल्या सदस्यांमधील तुमच्या मनामध्ये प्रेम वाढणार आहे आणि परस्पर संबंध देखील दृढ होणार आहेत. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर घराच्या उत्तर दिशेला निळा पडदा लावायचा आहे.

तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारची समस्या आहे त्याच्यावरून तुम्ही पडद्यांचे कलर निवडू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पडदे लावायचे आहेत.

यामुळे घरातले वातावरण सकारात्मक होऊन जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरांमध्ये असे वेगवेगळे कलरचे पडदे लावायचे आहेत जेणेकरून तुमच्या घरांमध्ये नेहमी सकारात्मक वातावरण तयार होणार आहे

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *