घरांत या रंगाचे लावा पडदे, होईल मोठा फायदा…

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

तुम्ही तुमच्या घरात कोणत्या रंगाचे पडदे लावले? अर्थात तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचे लावले असतील. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, वास्तुशास्त्रात हे तुला सांगितले.

की घरात कोणत्या खोलीमध्ये कोणत्या रंगाचे पडदे लावल्याने ज्याचा आपल्या घरात चांगला परिणाम होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरांमधल्या लोकांचाही मन प्रसन्न राहते. तुम्हाला माहीत नसेल तर माहिती पूर्ण वाचा.

वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असते आणि याचा परिणाम घरात राहणाऱ्या सदस्यांवर होत असतो. घरातले पडदे घराचे सौंदर्य वाढवतात.

तसं सूर्यप्रकाश आणि धुळीपासून घराचे संरक्षण सुद्धा करतात. वास्तुशास्त्रमध्ये घरातील पडद्यांची संबंधित काही खास नियम सांगितले आहेत. पडद्यांची संबंधित वास्तूचे नियम न पाळल्याने सुद्धा नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.

चला तर मग जाणून घेऊया की, घरांत कोणत्या खोलीमध्ये कोणत्या प्रकारचा पडदा लावावा.सुरुवात करूया ड्रॉइंग रूमपासुन. ड्रॉइंग रूम किंवा घरात पाहुण्यांसाठी वेगळी खोली असेल तर तिथे गडद रंगाचे पडदे लावा किंवा क्रीम रंगाचे पडदे लावा.

कारण असं मानलं जातं की, त्यामुळे घरात सकारात्मकता कायम राहते आणि घरात सुख संपत्ती येते. आता घरातील प्रमुख व्यक्ती आहे, घराचा मालक आहे त्याच्या खोलीमध्ये खिडकी आणि दरवाजा निळे किंवा तपकिरी किंवा केशरी रंगाचे पडदे लावल्यास

त्या कुटुंब प्रमुखाचा आरोग्य सुधारतं आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि या रंगाच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांची प्रगती होते. रंग आपल्या मनावर परिणाम करत असतात हे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झाले आहे.

जर तुमचं नुकतच लग्न झालं असेल तर पडद्याचा रंग निवडीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणजे पती पत्नीने आपल्या खोलीमध्ये लाल, जांभळा, गुलाबी रंगाचे पडदे लावावे, यामुळे वैवाहिक जीवनाला एक नवी ऊर्जा येते आणि पती-पत्नीमध्ये प्रेम सुद्धा वाढते.

याचबरोबर, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत हिरवे, गुलाबी रंगाचे पडदे लावावे. हे रंग शांती आणि आरोग्याचे दर्शक आहेत. अभ्यासिका असेल तर त्यात हिरवा पडदा लावल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचं मन हे अभ्यासात गुंतून राहण्यास मदत होते.

तसेच जर तुमचे घर लहान असेल तर मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात तिथे एखादी खिडकी असेल तर तिथे सुद्धा या प्रकारचे पडदे तुम्ही लावू शकता. देवघर जिथे असेल तिथे एखादी खिडकी असेल, तर तिथे तुम्ही केशरी किंवा हलक्या पिवळ्या रंगाचा परदा नक्कीच लावला पाहिजे.

हे दोन्ही रंग पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. या रंगाचे पडदे लावल्याने संपूर्ण घरात पवित्र वातावरण तयार होतो. आता घरात शांतता टिकावी यासाठी कोणत्या रंगाचे पडदे निवडावेत? तुमच्या घरातल्या सदस्यांमध्ये अनेक मतभेद होत असतील

किंवा एकमेकांचा पटत नसेल तर घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचे पडदे लावल्याने त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि परस्पर संबंध अधिक दृढ होतील.

जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर घराच्या उत्तर दिशेला निळा पडदा लावा. त्यामुळे तुमचे आर्थिक स्थिती सुधारेल. तर तुमची जशी समस्या आहे त्याप्रमाणे तुम्ही पडद्यांची निवड करू शकता. त्यामुळे निश्चितच तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *