ग्रहदोष दूर करण्यासाठी करा ‘या’ देवी देवतांची उपासना!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पहायला मिळते. ग्रहांची स्थिती जर शुभ असेल तर यामुळे आपणाला सौभाग्य, सुख यांची प्राप्ती होत असते. तसेच काही वेळेस ग्रहांची स्थिती जर अनुकूल नसेल तर आपल्याला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

म्हणजे ग्रहांचा शुभ अशुभ परिणाम हा आपणाला होतच असतो. तर आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रहदोष असेल तर हे ग्रहदोष दूर करण्यासाठी आपण नेमक्या कोणत्या देवी देवतांची उपासना करायला हवी. जेणेकरून आपल्याला शुभ प्राप्त होईल आणि गृह दोष दूर होतील. याचीच माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

तर ग्रहांची ग्रहांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित देवतांची पूजा करणे हा खूपच सोपा उपाय मानला गेलेला आहे. म्हणजे ग्रहदोष निवारणासाठी अनेक प्रकारचे उपाय आपणाला करणे गरजेचे आहे. जेणेकरून गृहदोष दूर होऊन आपल्या जीवनामध्ये यश, धन, समृद्धी प्राप्त होईल. तर हे ग्रहदोष दूर करण्यासाठी नेमके कोणत्या देवी देवतांची उपासना करावी चला तर जाणून घेऊया.

जर केतूचा प्रकोप झाला असेल आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अशुभ परिणाम होत असतील, अनेक संकटांना अडीअडचणींना सामोरे आपणाला जावे लागते. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही केतू ग्रहाची संबंधित जर दोष दूर करायचा असेल तर तुम्ही गणपतीची उपासना करणे खूपच गरजेचे आहे. गणेशाची जर तुम्ही पूजा केली तर यामुळे तुमचे सर्व दोष दूर नक्कीच होतील.

तसेच जर कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थितीत असेल त्या व्यक्तीला मग सहजपणे यश मिळत नाही. म्हणजेच त्या कामांमध्ये काही ना काही अडचणी या येत राहतात. राहू जर अशुभ स्थितीत असेल यामुळे अनेक प्रकारचे अडथळे येत असतील तर हे अडथळे दूर करायचे असतील तर तुम्ही भैरवाची पूजा अवश्य करावी. यामुळे राहूच्या अशुभ परिणामांना आपणाला सामोरे जावे लागणार नाही.

जर ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा ग्रह जर अशुभ स्थितीत असेल म्हणजेच शुक्र ग्रहाची संबंधित जर तुम्हाला त्रास दूर करायचा असेल आणि शुभ फळ जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा करावी. यामुळे शुक्र ग्रहाची संबंधित सर्व दोष दूर होतात आणि आपणाला त्याचा वाईट परिणाम सहन करावा लागणार नाही.

तसेच शनी ग्रहाचे नाव ऐकलं की सर्वच लोक खूपच घाबरतात. म्हणजेच कुंडलीत जर शनी ग्रह विशिष्ट ठिकाणी असेल तर मोठ्या अडचणी निर्माण करतो. त्यामुळे शनी ग्रहाचा अशुभ परिणाम जर दूर करायचा असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा अवश्य करावी आणि शनीशी संबंधित त्रास दूर करायचा असेल तर भगवान शिवाची उपासना करणे खूपच आपणासाठी मानले गेलेले आहे.

गुरु ग्रहाची उलटी चाल झाल्यास तुम्ही विष्णू किंवा ब्रम्हांजीची पूजा करावी. गुरु प्रसन्न असल्यास तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत म्हणजे जर गुरू ग्रह प्रसन्न असेल तर लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते. त्यामुळे तुम्ही विष्णूंची पूजा अवश्य करावी.

सूर्यमालेतला सर्वात लहान ग्रह म्हणजेच बुध ग्रह सूर्याच्या जवळचा देखील ग्रह म्हणजे बुध ग्रह हाच आहे. जर बुध ग्रह शुभ स्थितीत असेल तर तुम्ही बुधवारी गणेशाची पूजा करावी. यामुळे बुध ग्रहाचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर होणार नाहीत. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ग्रहांचा गृहदोष असेल तर तुम्ही ज्या त्या देवी देवतांची उपासना करणे पूजा करणे गरजेचे आहे. यामुळे त्यांचा अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *