गुरु पौर्णिमेला हे सोपे उपाय केल्यास दूर होऊ शकतात अडचणी

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. म्हणजेच आपल्या भविष्यामध्ये काय होणार, कोणत्या अडचणी येणार, आपल्याला शुभकाळ कोणता आहे असे अनेक गोष्टींची माहिती मिळते. तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला चढउतार हे पाहायला मिळतातच. म्हणजेच काही वेळेस आपल्याला सुखाचे दिवस अनुभवायला मिळतात. तर काही वेळेस दुःख देखील सहन करावी लागते.

तर तुम्हाला काही जीवनामध्ये अडचणी असतील म्हणजे पैशासंबंधीत असतील किंवा नवीन उद्योग जर तुम्ही काढला असेल आणि तो व्यवस्थित चालत नसेल म्हणजे अशा अनेक प्रकारच्या अडचणी जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते दूर व्हाव्यात यासाठी आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करीत असतो.

पण काही वेळेस काय होते की हे उपाय काहीच फरक देत नाहीत. तर आज मी तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाचे काही उपाय सांगणार आहे. तर हे उपाय नेमके कोणते आहे चला तर मग जाणून घेऊयात.

तीन जुलै म्हणजेच सोमवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंची पूजा करतो. तसेच गुरूंना अनेक भेटवस्तू देखील देत असतो. तर कुंडलीमध्ये जर आपल्या गुरु अशुभ असेल तर यामुळे देखील आपल्याला अडचणी येऊ शकतात. म्हणजेच गुरु अशुभ असल्यामुळे आपल्याजवळ असलेले सोने तसेच सोन्याचे दागिने चोरी होतात.

तसेच लग्न जमण्यामध्ये उशीर होतो किंवा जमलेले लग्न हे मोडते तसेच गुरु हा अशुभ असल्यामुळे पती-पत्नीमध्ये रोज काहीना काही कारणावरून वाद-विवाद होत असतात. तसेच अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या संबंधित अनेक अडचणी निर्माण होतात. समाजामध्ये मानसन्मान आपला कमी होतो.

म्हणजेच हा गुरु अशुभ असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे हे एकापाठोपाठ एक उभी राहतात.तर या सर्व अडीअडचणींवर, संकटांवर म्हणजेच आपला गुरु शुभ होण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपाय करणे खूपच गरजेचे आहेत. तर तुम्ही तीन जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद किंवा केशर टाकायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे.

हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडीअडचणी नक्कीच कमी होणार आहे.तसेच तुम्ही गुरुपौर्णिमेला रोज कपाळावर केशर किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि दररोज तुम्ही मग तिथून पुढे कपाळावर केशर किंवा चंदनाचा टिळा अवश्य लावायचा आहे. यामुळे आपला जो गुरु अशुभ असेल तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला होणार नाहीत. सर्व अडचणी नक्कीच दूर होतील.

तुम्ही गुरुपौर्णिमेला उपवास ठेवायचा आहे आणि संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करून मगच आपला उपवास सोडावयाचा आहे. तसेच तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. हा उपाय तुम्ही दररोज देखील करू शकता.

यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा खूपच फायदा आपल्याला होऊ शकतो. तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी घोड्याला हरभरे खाऊ घालावयाचे आहेत. यामुळे आपल्या गुरु ग्रहामुळे जो काही त्रास आपल्याला सहन करावा लागत होता तो नक्कीच कमी होणार आहे.

तर मित्रांनो असे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर केला तर यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी, संकटे दूर होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. तर असे हे उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *