गुरू प्रदोष व्रत कसे करावे? काय लाभ होतात? नक्की जाणून घ्या

अध्यात्म माहिती

मित्रांनो घरामधील सुख शांतीसाठी समृद्धीसाठी आपण वेगवेगळे व्रत करत असतो घरातल्या व्यक्तींसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपण नेहमी देवाजवळ प्रार्थना देखील करत असतो वेगवेगळे प्रकारचे व्रत देखील आपण करत असतो व्रताचे भरपूर प्रकार आहेत त्या मधलाच गुरु प्रदोष व्रत हा एक आहे तर तो कसा करावा त्याचे काय लाभ आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो प्रदोष जेव्हा गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते प्रदोष व्रत महिन्यातील पंधरवडा मध्ये येतो व ते त्रौदशी या दिवशी येतो हिंदू धर्मामध्ये प्रदोसाचे महत्व एकादशी एवढंच आहे. या दिवशी भगवान शिवा आणि माता पार्वतीची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी जर तुम्ही व्रत म्हणजेच उपवास केला तर तुम्हाला काही अडचणीअसतील तर त्या अडचणी दूर होणार आहेत. आणि जीवनामध्ये सुख-समृद्धी देखील येते.

महत्त्वाचं म्हणजे प्रदोष व्रत हे संतान प्राप्तीसाठी केले जाते हे व्रत केल्यानंतर संतान प्राप्त होऊन जातो गुरु प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया गुरु प्रदोष व्रता दिवशी देखील भगवान शंकरांची पूजा केली जाते त्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी भरपूर येते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत केल्याने तुम्ही पराभवाचा सामना करावा लागत नाही गुरु प्रदोष व्रत हे शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केला जातो असं शास्त्रात देखील सांगितले गेलेला आहे गुरु प्रदोष व्रत केल्यानंतर सुख-समृद्धी ऐश्वर्य हे सगळं त्या व्यक्तीला मिळून जातो.

जेव्हा भगवान शंकर रजत भवनावर तांडव करत असतात म्हणून महादेवांना संगीताचे जनक मानले गेलेले आहे जेव्हा भगवान शंकर रजत भावनावर नृत्य करत असतात तेंव्हा सर्व देवी देवता त्यांच्या गुणाची स्तुती करत असतात गुरु प्रदोष व्रता दिवशी पूजा कशी करावी चला तर मग आता आपण जाणून घेऊया

गुरु प्रदोष व्रता दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे त्याच्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे गुरु प्रदोष व्रतामध्ये भगवान शिव शंकरांची लाल व गुलाबी रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे. शिवलिंग वर बेलपत्र गंगेचं पाणी फळे फुले हे सर्व अर्पण करायचे आहे.

त्याच्यानंतर दिव्यांनी आरती देखील करायची आहे भगवान शिवशंकरांच्या बीज मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्रचा जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर शिव चालीसाचे तुम्हाला पठण देखील करायचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुप्रदोषाचे व्रत ऐकायला विसरू नये.

भगवान शंकरांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही अन्न पाणी ग्रहण करू शकता तुम्हाला त्या दिवशी पूर्णपणे उपवास करायचा आहे म्हणजेच की न काही खाता तुम्हाला उपवास करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं सूर्यास्ता पूर्वीची वेळ व सूर्यास्तानंतरची वेळ या मधल्या वेळेला प्रदोष काळ असे म्हटले जाते.

म्हणजेच की सूर्यास्तापूर्वीची 45 मिनिटांनी सूर्यास्तानंतरची 45 मिनिटे या दरम्यानच्या काळाला प्रदोष काळ असे म्हटले जाते आणि या काळामध्येच महादेवांची पूजा केली जाते प्रदोष व्रत हे वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे गुरु प्रदोष व्रत करायचा आहे आणि हा व्रत केल्याने तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ होणार आहे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *