गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात आणा स्वामींची आवडती ‘ही’ वस्तू ; स्वामींचा वास घरात राहील!

अध्यात्म माहिती

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त, सेवेकरी आहेत. स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहावे त्यासाठी स्वामींची आपण सेवा, मंत्रजप हे करीतच असतो. अनेक जण केंद्रांमध्ये जाऊन सेवा करीत असतात. तर अनेकजण हे घरांमध्ये स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न राहतात.

तर ३ जुलै म्हणजे सोमवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक जण स्वामींच्या मंत्रांचा जप करतात. तसेच स्वामींचा अभिषेक करतात. अनेक स्वामींच्या सेवा देखील करीत असतात. तसेच गुरुपौर्णिमेला आपण गुरूंचे पूजन देखील करीत असतो. हा दिवस खूपच विशेष आणि शुभ मानला गेलेला आहे.

स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त सेवेकरी या दिवशी अनेक स्वामींची सेवा करीत असतात. तर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी स्वामींच्या आवडीच्या वस्तू जर आपल्या घरामध्ये आणल्या तर यामुळे स्वामी नक्कीच आपल्या प्रसन्न होतात.

स्वामींना जर तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य करू शकता. तसेच स्वामींच्या मंत्राचा जप करू शकता. स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तसेच अनेक प्रकारच्या स्वामींच्या आवडत्या वस्तू आहेत त्यापैकी कोणतीतरी वस्तू तुम्ही खरेदी करून आपल्या घरामध्ये आणली तरी देखील स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात.

तर स्वामींना अष्टगंध खूपच प्रिय आहे. तुम्ही अष्टगंध गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवश्य खरेदी करून आपल्या घरी आणू शकता. तसेच स्वामींना हिना अत्तर देखील खूपच प्रिय आहे. तुम्ही हिना अत्तर खरेदी करून घरात आणून थोडेसे दोन तीन थेंब आपल्या हातावर घ्यायचे आणि चिमूटभर अष्टगंध त्यामध्ये टाकून ते व्यवस्थित मिक्स करून त्या अत्तर मिश्रित अष्टगंधाचा टिळा तुम्ही स्वामींना लावला तरी देखील स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात.

तसेच तुम्ही चाफ्याची फुले देखील स्वामींना अर्पण करू शकता. जर तुम्हाला चाफ्याची फुले मिळाली तर चाफ्याच्या फुलांचा हार बनवून स्वामींच्या फोटोला घालू शकता किंवा एक दोन चाफ्याची फुले तुम्ही स्वामीना अर्पण करू शकता. त्यापैकीच स्वामींची आवडती जी वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ. मित्रांनो स्वामीना रुद्राक्षाची माळ खूपच अतिशय प्रिय आहे.

तुम्ही रुद्राक्षाची माळ केंद्रातून किंवा मठातून खरेदी करून आपल्या घरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य आणा आणि ही माळ खरेदी करून आणल्यानंतर तिची व्यवस्थित पूजा करून नंतर तुम्ही त्या रुद्राक्षाच्या माळेने श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप जर केला तर यामुळे स्वामी नक्कीच आपल्या घरामध्ये वास करतील.

ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि मग दररोज तुम्ही त्या रुद्राक्षाच्या माळेने स्वामींचा मंत्र जप करू शकता. तर येणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या आवडीच्या वस्तू या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू जरी तुम्ही खरेदी करून आपल्या घरी आणली तर स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *