हनुमानाची ‘या’ वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे व्रत ,उपवास, पूजा अगदी मनोभावे, श्रद्धेने करीत असतो. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांचे विशेष असे स्थान आहे. मित्रांनो बरेच जण हे आपल्यापैकी हनुमानाचे भक्त आहेत आणि अगदी मनोभावे ते पूजा करीत असतात.

तर मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीनुसार, कोणत्याही देवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांची योग पद्धतीने पूजा करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो मंगळवार हा हनुमान यांना समर्पित आहे. तर मंगळवारी तुम्ही जर हनुमानांची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. भक्तांचे सर्व दुःख हे दूर करून त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणतात. तसेच मित्रांनो हनुमानाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील जी काही भीती असेल, दुःख असेल, जो काही त्रास असेल तो दूर होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळचा प्रभाव कमी आहे त्यांनी मंगळ दोषापासून मुक्ती मिळण्याबरोबरच संकटमोचनाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी योग्य वेळी हनुमान यांची पूजा केल्यास चमत्कार लवकर दिसून येतात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानजीची पूजा केल्यास हनुमानजी लवकर प्रसन्न होतात. तर मित्रांनो हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मंगळवारी सकाळी स्नान झाल्यानंतर लाल रंगाचे कपडे आपण परिधान करावे. शक्य असल्यास लाल रंगाचे कापड हे शिवलेले नसावे.

तसेच घरात बनवलेले पूजेचे ठिकाण हे स्वच्छ करावे. घराच्या ईशान्य कोपर्‍यात एक चौकी बसवा आणि त्यावर लाल रंगाचे कापड पसरवा. त्यानंतर हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. तसेच प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास विसरु नका.

त्यानंतर मित्रांनो,हनुमानाच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान पठण करावे. मग रामाची प्रार्थना करावी नंतर हनुमानाला लाल रंगाची फुले आणि सिंदूर अर्पण करा. तर मित्रांनो हनुमानजी यांचा कृपाआशीर्वाद तसेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय देखील या मंगळवारच्या दिवशी करू शकता.

ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी हनुमान चालिसा पठण करावे. तसेच सुंदरकांड पठण केल्याने शनीच्या सती आणि धैय्यापासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाची पूजा अत्यंत लाभदायी मानली जाते.

जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगल दोष असेल आणि मंगल बळकट करायचे असेल तर हनुमान चालीसा पाठण करा आणि वानरांना हरभरे खाऊ घाला. हे तुमच्यासाठी शुभ असून त्याचे चांगले फळ मिळते. मंगळवारी व्रत ठेवल्याने मान-सम्मान मिळतो. या दिवशी हनुमानजींची विधिवत पूजा केल्याने भक्तांची सर्व संकटे दूर होतात.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *