हे केलं तर कधीच पितृदोष होणार नाही.

अध्यात्मिक माहिती

घरात हे एक काम करून पित्रांना प्रसन्न करा. याने असलेला पितृदोष दूर होईल, नाहीसा होईल आणि यामुळे घरामध्ये भरभराटी येईल. मित्रांनो बघा ज्या घरावर ज्या परिवारावर ज्या लोकांवर आपली पितृ प्रसन्न असतात त्या घरावर कोणतीही विपदा, कोणतेही संकट, कोणतीही समस्या येतच नाही आणि ज्या घरावर पितृ प्रसन्न नसतात मग त्या घरावर आजार पण असू द्या.

पैशाची समस्या असू द्या किंवा कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जाण्याची विपदा आलेली असती ती असू द्य, हे सुरूच असते एका मागे एक. यापासून वाचण्यासाठीच पितृ प्रसन्न असले पाहिजे. बरेचसे लोकं पितृपक्षांमध्ये पित्रांना तृप्त सुद्धा करत नाही. परंतु जर दररोज आपण हे एक काम केले तर आपले पितृ आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

आणि मग पितृदोष आयुष्यात कधी होणार नाही. असलेला सुद्धा नाहीसा होईल आणि घरात भरभराट येईल. आता हे एक काम कोणते? तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराच्या या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कोणता? कसा लावावा? तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे.

तेलाचा, तुपाचा, कापसाच्या वातीचा, धाग्या दोऱ्याचा वातीचा किंवा कोणताही कसाही दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. तो संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान तुम्हाला घराचा मागच्या बाजूला दरवाजा असेल ते तिथे दक्षिण दिशेकडे त्या दिव्याची ज्योत करून तो दिवा लावायचा आहे.

मागच्या बाजूला दरवाजा नसेल तर मग मुख्य दाराच्या बाहेर म्हणजे पुढच्या बाजूला दक्षिण दिशेकडे ज्योत करून तो दिवा लावायचा आहे. मागे लावा पुढे लावा पण दक्षिण दिशेकडे ती ज्योत करा आणि मगच लावा. पण प्राधान्य असू द्या की जर मागच्या दरवाजा असेल, बालकनी असेल तर तिकडे तुम्ही लावू शकता.

पण मागे काही सोय नाहीये तर मग पुढच्या बाजूला लावा पण दक्षिण दिशेकडे त्या दिव्याची ज्योत असली पाहिजे याची काळजी घ्या. तुम्ही जर पुढे तुळशी कडे संध्याकाळी किंवा दाराचा बाहेर दिवा लावत असाल तर तोही लावा आणि हा दक्षिण दिशेकडे ज्योत करून हा सुद्धा लावा. नक्कीच पितृ प्रसन्न होतील आणि घरात भरभराट येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *