धुलीवंदन होळीच्या पवित्र चिमुटभर राखेचे अद्भुत उपाय नक्की करा..

अध्यात्मिक

प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चैत्र प्रतिपदेला होळी खेळली जाते. धुलीवंदन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेला होते.
होळीचा सण होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाईल.

पारंपारिक होळीचा सण साजरा करण्यासाठी गोवऱ्या आणि टीमक्या तसेच पूजा साहित्याने बाजारपेठ गजबजून जातात. घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी होळी उभी करून सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळ झाली की, होळी पेटवतात. कारण वाईट वृत्ती अमंगल आणि नकारात्मक गोष्टी होळीच्या अग्नीमध्ये नष्ट व्हाव्यात असा त्यांचा उद्देश असतो.

अनेक ठिकाणी होळीचे दहन करताना त्यात 7 प्रकारची धान्ये आणि गव्हाच्या ओंब्या टाकल्या जातात. आपल्या शेतातील नवीन पीक अग्नी देवतेला अर्पण करणे, हा त्यामागचा हेतू असतो. तसेच घरात सुख-शांती समाधान नांदावे यासाठी देखील होळीत गव्हाच्या ओंब्या टाकल्या जातात. गव्हाच्या ओंब्या देवाला अर्पण केल्यास आपल्याला पूर्वजाचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे.

तसेच होळीच्या अग्नीत गव्हाच्या 7 ओब्या अर्पण करण्याची प्रथा आहे, कारण 7 हा अंक शुभ मानला जातो आणि सर्वच कार्यामध्ये 7 अंकाला खूपच महत्व आहे. भारतामधील शेतकरी वर्गात होळीच्या सणाला खास महत्त्व दिले जाते आणि इतिहास पाहिला तर या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसते. होळीच्या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते.

या दिवशी हाताशी आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याची आणि प्रार्थना करण्याची प्रथा आहे. होळीनंतर दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची परंपरा आहे. नवीन आलेली पिकं या दिवशी अग्नी देवतेला अर्पण करण्याची ही परंपरा आहे. याचबरोबर एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू याचा भक्त प्रल्हाद यांला मारण्यासाठी हिरण्या कश्यपूणे होलिकेला सांगितले. कारण होलिकेला वर होता की, तिला अग्नी जाळू शकणार नाही.

पण प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. मात्र भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद तर वाचला, परंतु होलिकेचे दहन झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाच प्रकारे हिंदूंच्या इतर सणासारखे होलिका दहन हेदेखील वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतिक आहे. कारण वाईट गोष्टीवर विजय मिळवणें हाच या सणाचा हेतू आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *