जेवण झाल्यानंतर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते?

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. अन्न खाल्ल्याने आपले शरीर हे सुदृढ आणि निरोगी राहते. आपल्याला योग्य तो आहार घेणे खूपच गरजेचे असते. मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. म्हणजेच आपण जेवण कोणत्या दिशेने बसून खावे किंवा कोणत्या ठिकाणी बसून आपणाला अन्न खायचे नाही.

या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कारण या जर गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो. म्हणजेच चुकीच्या दिशेने आपण जर अन्नग्रहण केले तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातकही असू शकते.

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे जेवणानंतर ताटामध्ये हात धुतात तर काहीजण हे ताटामध्ये हात धूत नाहीत. तर आपल्या शास्त्रांमध्ये ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले गेलेले आहे. तर हे अशुभ का मानले गेलेले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अन्नाच्या प्रत्येक कणाला सन्मान देण्याचीच भावना आहे. भोजनापूर्वी हे अन्न ईश्वरस्वरूप आहे. अशा आशयाच्या प्रार्थना किंवा श्लोक म्हणण्याचीही पद्धत आहे. यामुळे ताटामध्ये हात धुणे अयोग्य मानले गेलेले आहे. असे जर आपण केले तर अन्नदेवतेचा अपमान होतो. त्यामुळे ताटामध्ये हात अजिबात धूऊ नये.

ताटात हात धुणे किंवा न धुणे या गोष्टीपेक्षाही अन्नाची नासाडी होणार नाही ही भावना अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे भोजनापूर्वी भोजनमंत्र म्हणून प्रसन्न मनाने भोजन करावे. अन्न हे परब्रह्म असल्याने अन्नाचा सन्मान करावा. आपण अन्न सेवन केल्यानंतर आपणाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि ती आपल्या शरीरासाठी खूपच चांगली मानली जाते.

म्हणूनच उर्जेला माता महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते. अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि म्हणूनच या पूर्णब्रह्मातून निर्माण झालेली चैतन्य ऊर्जा आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते. जर तुम्ही जेवण झाल्यावर ताटामध्ये खरकट्या हाताने हात धुवत असाल तर असं करणे म्हणजे माता अन्नपूर्णाचा अपमान समजला जातो.

यामुळे माता अन्नपूर्णाचा अपमान होतो त्या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या माता महालक्ष्मीचा देखील अपमान होत असतो. यामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडीअडचणी, दारिद्र्य निर्माण होण्यास सुरुवात होते. तसेच पैसा देखील खर्च होऊ लागतो. त्यामुळे जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुणे हे अयोग्य गोष्ट आहे. हे शास्त्रात सांगितले गेलेले आहे.

त्याचबरोबर अन्न सेवन करताना काही छोट्या गोष्टी जाणून घेणे देखील गरजेचे आहे. आपण जेवण करण्यापूर्वी व जेवण झाल्यानंतर परमेश्वराचे आभार मानायला हवे. आपल्याला गरज असेल तितकच अन्न सेवन करायला हवे जास्त अन्न वाया घालू नका. कारण अन्न वाया घालवल्याने आपल्यावर देवी देवतांचा कोप होतो. ताटामध्ये जेवण उरलेले फेकून न देता चिमणी, कावळे यांना द्या. जेवण करताना नेहमी आसन घेऊन बसा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *