कधीही एकादशीचं व्रत करताना या नियमांचं करा पालन; भगवान विष्णूची लाभेल कृपादृष्टी

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात बरेचजण अनेक व्रत, उपवास मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. अमावास्या, पौर्णिमेसह एकादशी, चतुर्थीसारख्या काही तिथींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक जण आपल्या आराध्य देवीदेवतांचे विधिवत पूजन करतात. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत अशी मनोभावे ते प्रार्थना देखील करीत असतात आणि उपवास करत असतात.

आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. मात्र दर महिन्याच्या एकादशींच्या व्रताच्या माध्यमातूनही भगवान विष्णूची आराधना केली जाते. एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास जीवनातल्या सर्व समस्या आणि दुःखं दूर होतात असे मानले जाते. दर महिन्याच्या एकादशीला भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते.याला एकादशी व्रत असंही म्हणतात.

एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमुळे संबंधित व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. परंतु आपणाला या एकादशीच्या व्रतादिवशी असे काही नियम पाळायचे आहेत. हे जर नियम आपण पाळले तर भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपणावर राहते. तर हे नेमके कोणते नियम आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

एकादशीला पवित्र स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्या दिवशी शक्य असल्यास पवित्र गंगा नदीत स्नान करावं आणि हळद, केशर आणि केळी दान करावीत. तसेच अन्न, धन किंवा वस्त्र दान केल्यास पुण्यफलप्राप्ती होते. एकादशीला व्रत करावं आणि त्या महिन्यातील एकादशी व्रताची कथा श्रवण करावी.

हे आपल्यासाठी लाभदायी ठरते. कोणत्याही एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना करावी आणि पूजेसाठी तुळशीपत्र आणि पंचामृत वापरावं. या दोन्ही गोष्टी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत. यामुळे विष्णूची कृपादृष्टी लाभते. तर तुम्ही जर एकादशीच व्रत करत असाल तर या दिवशी भात, पान, वांगी, कोबी आणि पालक यांचे सेवन अजिबात करायचे नाही.

कारण याचा मग दोष निर्माण होऊन भय वाढते. तसेच एकादशीला कोणत्याही तामसी पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही. यामुळे आपले नुकसान होऊ शकते. यादिवशी मांस, मद्य, कांदा आणि लसूण आहारात असू नये. एकादशीच्या दिवशी सात्त्विक आहार घ्यावा. एकादशीला घरात केरसुणी वापरू नये.

कारण केरसुणी वापरल्यास लहान जिवांची हत्या होण्याचं भय वाढतं. यामुळे जीवहत्येचा दोष लागू शकतो, असे पौराणिक कथांमध्ये म्हटलं आहे. जे लोक एकादशीचे व्रत करीत असतात यांनी आपल्या मनामध्ये इतर व्यक्ती विषयी कोणतेही वाईट तसेच कटू विचार अजिबात आणू नयेत.

कारण याचा उलटा परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही देखील एकादशीचे व्रत करीत असाल तर या नियमांचे अवश्य पालन करा. जर तुम्ही या नियमांचे पालन केला तर यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुमच्या जीवनात शुभ घडेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *