कालसर्प दोष म्हणजे नेमकं काय कालसर्प दोष घालवायचे उपाय

अध्यात्मिक माहिती

ज्योतिष्य शास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे आपल्या कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. असे अनेक योग ज्योतिष्यशास्त्रात सांगण्यात आले आहेत जे खूप भयंकर आहेत. या योगांपैकी एक आहे कालसर्पयोग. हा योग एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. या कालसर्प दोषामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष तयार होतो ते घर निष्फळ होते, त्यांना कुठलेही फळ मिळण्यास अडचणी निर्माण होतात. व्यक्तीच्या जन्मंग चक्रात राहू आणि केतूची स्थिती एकमेकांच्या विरुद्ध असते, दोन्ही 180 अंशा वर राहतात. राहू केतूच्या एका बाजूला उर्वरित सात ग्रह असतील आणि दुसऱ्या बाजूला ग्रह नसतील अशा स्थितीत कालसर्पयोग तयार होतो.

यालाच कालसर्प दोष म्हणतात. जर अशी काही लक्षणे दिसत असतील तर समजून जा की तुम्हाला कालसर्प दोष असेल किंवा आपल्या नजीकच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन ही समस्या सांगा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपयशाला सामोरे जावे लागते. घरामध्ये मांगलिक कार्य शक्य होत नाही.

संतान होण्यास अडथळा येतो, मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबात आनंद येत नाही, नेहमीच तणावाची परिस्थिती असते, पैशाच्या बाबतीत नातेवाईक फसवणूक करतात, नेहमी आजारांनी ग्रासलेले असते, आरोग्य चांगले राहत नाही, आपल्या व्यवसायात सतत अडथळे येत असतात आणि सतत तोटा सहन करावा लागतो.

इतकेच नाही तर स्वप्नात मुंडन, मिरवणूक, नदीत उडताना आणि स्वप्नात अंगहिन व्यक्ती दिसते, स्वप्नातील मृत व्यक्ती तुम्हाला काहीतरी विचारते, मेहनत करूनही कामात अपेक्षित यश न मिळणे, मानसिक तणावामुळे त्रस्त, योग्य निर्णय घेण्यात असमर्थता, विसंगत कुटुंबिक जीवन, गुप्त शत्रू असणे, कामात व्यत्य येणे अशा प्रकारच्या क्रिया जाणवू लागतात.
पण घाबरण्याचे काहीच कारण नाही.

आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रात यावर उपाय देखील सांगितले आहेत. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याचे निवारण करून त्याचा त्रास कमी करता येईल. कालसर्पदोषाचा सर्वोत्तम उपाय म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शिवाचा रुद्राभिषेक करणे होय. शिवलिंगावर साखर आणि दूध अर्पण करावे तसेच दररोज शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे.

तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी दररोज भगवान श्रीकृष्णाच्या मोरपंख असलेल्या मूर्तीचे पूजन करावे. कालसर्पदोसा पासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच राहूच्या शांतीसाठी रात्री शिव मंदिरात किंवा राहूकाळात राहूची पूजा करा. वाहत्या पाण्यात नाग आणि नागाची जोडी चांदीची बनवून पद्धतीप्रमाणे प्रवाहित म्हणजेच विसर्जित करा. असे केल्याने कालसर्पयोग नक्कीच घालवण्यात येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *