कालसर्प दोष शांतीसाठी अमावस्येला करा हे उपाय!

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या कुंडलीत असणाऱ्या अनेक दोषामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडीअडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतो. यावरती आपण अनेक ज्योतिषांचा देखील सल्ला घेत असतो. मित्रांनो बऱ्याच कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो आणि याचा खूपच वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.

कुंडलीत राहू आणि केतूच्या विशेष स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण होतो. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे अशा लोकांनी सोमवती अमावस्येला काही उपाय केले तरी यामुळे आपल्या कुंडली मधील कालसर्प दोष हा दूर होऊ शकतो. जन्मकुंडलीत कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीच्या करिअर किंवा व्यवसायात प्रगती होत नाही.

वैवाहिक जीवनातील अडथळे तुम्हाला त्रास देतात. मृत्यूची भीती असते आणि स्वप्नात साप दिसू शकतात. कालसर्प दोषामुळे शारीरिक वेदना, आजारपण इ. गोष्टी होतात. तर 2023 सालची पहिली सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारीला आहे. ही माघ अमावस्या म्हणजेच सोमवारी असल्यामुळे सोमवती अमावस्या आहे. बरेच लोक सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात.

तसेच सूर्य देवाची पूजा केल्यानंतर दान देखील केले जाते दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. सोमवती अमावस्या 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 04:18 ते 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:35 पर्यंत असेल. या दिवशी पहाटेपासून परीघ योग आणि सकाळी 11:03 पासून शिवयोग आहे.

सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. ज्या स्त्रिया व्रत ठेवतात, त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी सोमवती अमावस्येला काही सोपे उपाय करून यापासून मुक्ती मिळवू शकतात.

तर कालसर्प दोष यातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून शंकराची विधीवत पूजा करायचे आहे आणि त्यानंतर शिवतांडव स्त्रोत किंवा शिव रक्षा स्त्रोतांचे पठण करायचे आहे. कालसर्प दोष असणाऱ्या व्यक्तीने राहू कालामध्ये शंकराची पूजा करायची आहे.

तीर्थ स्नानानंतर चांदीचा नाग आणि नागिणीच्या जोडीची पूजा करावी यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष हा दूर होतो.
त्यानंतर ती मूर्ती नदीच्या प्रवाहात विसर्जित करून द्यावी. त्यानंतर नतमस्तक होऊन कालसर्प दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी.

तसेच तुम्ही जर सोमवती अमावस्येच्या दिवशी रुद्राभिषेक केला तरी यामुळे देखील तुम्हाला मुक्ती मिळू शकते. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे रुद्राभिषेकासाठी हा खूपच शुभ दिवस मानला गेलेला आहे. यामुळे इतर ग्रह दोषही यामुळे शांत होतात. राहु ग्रहाला शांत केले तरी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.

मित्रांनो तुमच्याही जन्म कुंडली मध्ये जर कालसर्प दोष असेल आणि या दोषामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागू नये म्हणजेच आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष हा दूर व्हावा यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी अवश्य करावे. यामुळे तुम्हाला कालसर्पदोषापासून मुक्ती अवश्य मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *