कामाख्या देवीचे मंदिर 4 दिवस बंद का असते?

अध्यात्म माहिती

भारतातील रहस्यमय मंदिरामध्ये ज्या मंदिरांचा पहिला क्रमांक लागतो हे मंदिर म्हणजे आसामच्या गुवाहाटीमध्ये असणाऱ्या कामाख्या देवी मंदिर आणि या मंदिरात होणारा रहस्यमय उत्सव अंबुबाची उत्सव होय कामाख्या देवी मंदिरामध्ये योनीची पूजा होते आणि प्रसाद म्हणून लाल कापड दिल्या जातात.

या आणि अशा अनेक कथा कामाख्या देवी मंदिरशी संबंधित आहे. पण नक्की या सगळ्या मागचं रहस्य काय? चला जाणून घेऊया.. कामाख्या देवी मंदिर प्रसिद्ध अंबुबाची उत्सव नुकताच 22 जून ते 28 जूनच्या दरम्यान पार पडला. पण हा उत्सव नक्की असतं तरी काय? आसाममधील गुवाहाटी येथे असलेलं कामाख्या देवी मंदिर एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे.

कामाख्या देवी मंदिरात अघोरी आणि तांत्रिक यांची मोठी गर्दी असते. कामाख्या मंदिर हे सर्व शक्तीपीठ पैकी महापीठ मानले जात. या मंदिराशी अनेक रहस्य प्रसिद्ध आहेत. माता सतीने आपला देह सोडला तेव्हा भगवान विष्णूंनी माता सतीशी असलेली भगवान शिवाची आसक्ती दूर करण्यासाठी आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे 51 भाग केले.

हे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्ती पीठ तयार झाले आणि त्यातच आता मधल्या गुवाहाटी इथे तिथे कामाख्या देवी मंदिर आहे तिथे मातेचा योनीभाग पडल्याचे सांगितले जातात आणि म्हणून हे शक्तिपीठ महापीठ आहे.देवीचा धार्मिक मान्यतेनुसार देवीचा योनी माहिती असल्यामुळे देवी रजकला सुद्धा होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कारिक आणि रोचक गोष्टींनी भरलेला आहे.

तसेच या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही तिथे देवीच्या योनी भागांची पूजा केली जाते. या मंदिरात एक कुंड सुद्धा आहे हे नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असत. कामाख्या देवी मंदिर तीन भागात बनवले. पहिला भाग सगळ्यात मोठा आहे आणि प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही. दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे इथे दगडातून सतत पाणी येत असत.

असं मानलं जातं की, वर्षातून एकदा माता रजस्वला येते आणि तेव्हा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येत. मग 3 दिवसानंतर पुन्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात. यालाच अंबुबाची उत्सव म्हणतात. हा उत्सव धुमधडाक्यात मंदिराचे दरवाजे उघडले जातात.या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे खास प्रकारचा प्रसाद मिळतो. खास प्रसाद म्हणून भक्तांना या उत्सवादरम्यान ओले कापड दिले जाते.

या कापडाला अंबुबाची कापड म्हणतात. असे म्हणतात की, जेव्हा देवीला मासिक धर्म येतो तेव्हा तिच्या मूर्तीभोवती पांढरे वस्त्र पसरवले जाते आणि तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा हे कापड लाल रंगाने भिजलेले असते.वर्षांतून एकदाच येणाऱ्या या अंबुबाची उत्सवाला सर्व तांत्रिक, मांत्रिक लोकची गर्दी असते,

त्यांच्यासाठी हा उत्सव एक वरदान मानला जातो. अंबुबाची पर्व भगवती सतीचे रजस्वला पर्व असते. पौराणिक मान्यतेनुसार हे पर्व कलीयुगात वर्षातून एकदा तर कधी उगाच प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यामध्ये हे पर्व येते. यासाठी कामाख्या देवी मंदिर आणि अंबुबाची उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *