करा ‘या’ मंत्राचा जप 21 दिवसात होतील सर्व इच्छा पूर्ण!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा ही असतेच. ती पूर्ण होण्यासाठी आपण दिवस रात्र काबाडकष्ट करीत असतो. काही वेळेस आपल्या या इच्छा अपूर्णच राहतात. तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची इच्छा 21 दिवसांत पूर्ण होईल.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा-अर्चा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते. या दिवशी गुरू ग्रहाला बलवान करण्याचे उपायही शास्त्रात सांगितले आहेत. या दिवशी श्री हरीची पूजा केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

असे म्हटले जाते की जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिली असेल तर गुरुवारी भगवान नरसिंहाच्या मंत्रांचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जर तुम्हाला शत्रूंमुळे त्रास होत असेल आणि तुम्ही काही करू शकत नसाल तर गुरुवारी नरसिंहाची पूजा करावी. मंदिरात बसून भगवान नरसिंहाच्या मंत्रांचा जप केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळेल.

मित्रांनो, जर तुमची काही विशेष इच्छा असेल, जी सहजासहजी पूर्ण होत नसेल तर गुरुवारी विष्णुसहस्त्रनाम पठणाचा विधी सुरू करावा. स्नाना झाल्यानंतर नियमितपणे भगवान विष्णूची पूजा करायची आहे. नंतर विष्णु सहस्त्रनामचे 51 वेळा पठण करायचे आहे. हा उपाय तुम्हाला 21 दिवस सतत करावा लागेल.

हा उपाय केल्याने तुमची मोठी समस्या देखील दूर होईल. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. तर तुमची देखील इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *