कर्जातून सुटका हवी आहे? तर मग करा हे ज्योतिषी उपाय!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कर्ज, उधारी हे असते. कर्जामध्ये ते इतके बुडून जातात की त्यांना शेवटी जगणे देखील मुश्किलीचे होऊन जाते. कर्जाचे ओझे वाढतच गेल्यामुळे पैशांच्या खूप सार्‍या अडचणी निर्माण होतात आणि मग घरामध्ये वाद-विवाद, भांडणतंटे होत राहतात म्हणजेच घरामध्ये सुख समृद्धी तसेच शांतता लाभत नाही. प्रत्येकालाच आपल्या कर्जाचे ओझे कमी व्हावे असे वाटत असते. त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करीत असतो.

खूप सारे प्रयत्न करून देखील आपली जर कर्जमुक्ती होत नसेल तर बरेचजण टोकाचे पाउल देखील उचलत असतात. परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही ज्योतिषी उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमची कर्जमुक्ती नक्कीच होईल. तर हे ज्योतिषी उपाय नेमके कोणते आहेत चला तर जाणून घेऊयात.

मित्रांनो तुम्हाला जर कर्जातून मुक्तता हवी असेल तर तुम्ही शिवलिंगावर रोज लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत. यासाठी सकाळी लवकर उठून शिवलिंगावर लाल रंगाची फुले अर्पण करावी आणि जलदेखील अर्पण करावे. असे केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली कर्जातून मुक्तता देखील ते नक्की करतात.

जर तुम्हाला जमीन मालमत्तेशी संबंधित खूप कर्ज असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करायची आहे. मंगळवार आणि शनिवार हे दिवस हनुमानजींच्या पूजेसाठी विशेष असतात आणि या दोन दिवशी हनुमानजींना पिवळे सिंदूर लावून हनुमान चालीसा वाचायचे आहे. यामुळे तुमचे कर्ज लवकर कमी होण्यास मदत होईल.

कर्जमुक्ती मिळवण्यासाठी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करायला विसरु नका. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीपुढे दिवा लावून ॐ श्रीं ह्रीं कमाले कमलाये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा जप करायचा आणि लक्ष्मीची आरती करावी. यामुळे धनाची देवी लक्ष्मी तुम्हाला कर्जातून मुक्त करण्यासाठी नक्की मदत करेल.

मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे जर उपाय अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर केले तर तुमच्या डोक्यावर कितीही मोठे कर्जाचे ओझे असेल तर त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुमची कर्जातून सुटका देखील होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *