कर्माला द्यायची असेल भाग्याची साथ, तर दरराेज करा ‘या’ पाच गाेष्टी

अध्यात्मिक

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये आनंदीदायी वातावरण असावे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये असे वाटत असते. परंतु मित्रांनो आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या आपल्या कर्मानुसार त्याचे फळ मिळत असते. म्हणजेच जर आपण कर्म चांगले केले असेल तर आपल्या जीवनात देखील चांगलेच होत राहते. त्याचे फळ आपणाला शुभ मिळत असते. परंतु मित्रांनो काही काही वेळेस या कर्माबरोबरच आपणाला आपल्या भाग्याची देखील साथ हवी असते.

ज्योतिषशास्त्रात आपल्याला अनेक प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय जर आपण केले तरी यामुळे आपणाला भाग्याची देखील साथ मिळू शकते. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपणाला यश प्राप्त होते.

तसे तर मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. तरीदेखील आपणाला त्यामध्ये यश मिळत नाही.

ज्योतिष शास्त्रात आणि वास्तूशास्त्रात सांगितलेले काही उपाय जर आपण केले तर आपले भाग्य बदलू शकते. तसेच या उपायामुळे आपल्याला कर्माबरोबर भाग्याची देखील साथ मिळते. तर मित्रांनो हे उपाय नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया.

तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे. असे केल्याने जीवनात समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. तसेच जेवताना कधीही चपला घालू नयेत. हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

मित्रांनो आपण नियमित देवपूजा करीत असतो. तर मित्रांनो
नियमित पूजा केल्यानंतर देवघरासमाेर दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये देवतांचा आशीर्वाद कायम राहतो. घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर रोज संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा.

मित्रांनो आपण देवपूजा करताना अनेक वेगवेगळे प्रकारची फुले देवांना अर्पण करीत असतो. परंतु ही फुले दुसऱ्या दिवशी काय करायची याबद्दल कोणाला जास्त माहिती नसते. बरेच जण ही फुले फेकून देतात. ज्योतिषशास्त्रानुसार पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नयेत.

ही फुले गोळा करून वाहत्या पाण्यात विसर्जीत करावे. याशिवाय तुम्ही ही फुले खड्ड्यातही पुरू शकता. तसेच हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सकाळी उठल्यावर आणि स्नान केल्यानंतरच देवाच्या मूर्तीला स्पर्ष करावा. आंघोळ न करता देव घराला स्पर्ष केल्यास देवघराचे पावित्र्य भंग हाेते. लक्ष्मी आपल्यावर नाराज हाेते.

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा खूप शुभ असतो. तसेच नकारात्मक शक्ती देखील या दिशेने लवकर प्रवेश करतात. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये यासाठी या दिशेला गंगेचे पाणी नियमित शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमच्या कर्माबरोबर तुम्हाला भाग्याची देखील साथ मिळत राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *