कसे असतात ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक??

माहिती राशिभविष्य

तुमचा जन्म ऑगस्टमध्ये झालाय का? किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म ऑगस्टमध्ये झालाय का? तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये कोणी ऑगस्टमध्ये जन्मला आलेय का? ऑफिस, शेजारीपाजारी किंवा नातेवाईक कोणी आहे का? कोणीतरी असणारच. चला तर मग बघुया ऑगस्टमध्ये जन्मलेली लोक नक्की कशी असतात?….जाणून घेऊ..

ऑगस्टमध्ये जन्माला आलेली लोक अतिशय भाग्यवान असतात, कारण त्यांना सूर्याचे विशेष बळ मिळतं. कारण या महिन्याचा गुरु सुर्य हा ग्रह असतो. त्यामुळे सुर्याप्रमाणे ते आपआपल्या क्षेत्रात चमकणारी कामगिरी करतात ते उच्च जीवनशैलीत जगतात आणि मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात.

त्यांच्याबरोबर त्यांच्या ठायी असलेल्या नम्रता त्यामुळे ते आई-वडिलांची सेवा, गरिबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकपणा हे दोन्ही गुण असतात. ते दुसर्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदात असतात.

ते प्रत्येक नातं इमानदारीने निभावतात. या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य होतो. आपलं ध्येय गाठताना ते सत्याची कास सोडून देत नाहीत. स्वतः प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा मात्र करतात, अशा लोकांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते. गंमत म्हणजे कोणी यांची स्तुती केली नाही, तर ते स्वतः आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणी किंवा मोहाला बळी पडत नाही. योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूपच उपयोग होतो.
सूर्याचे जसे तेज त्यांच्या कार्याला मिळतात त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात येतो. काही वेळा ते रागाच्या भरात उलट-सुलट बोलून चांगली संधी गमावून बसतात.

मात्र ही लोक कधीच हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाही. या गोष्टींची त्यांना मूलता चीड असते. या लोकांना निरोगी आयुष्याचा वरदान असत. मध्यम बांधा, साधारण उंची व्यक्तिमत्व रुबाबदार पण केस मात्र विरळ होण्याची शक्यता असते आणि त्याच उच्च राहणीमानाची हायफाय लाईफ आवड असते.

त्यामुळे ही लोक आपल्या वाईट गुणांवर सहज मात करतात. आपल्याला आणखीन चांगले कसे राहता येईल? कसा करता येईल? याचा विचार करतात आणि त्यासाठी मेहनत घेतात.
त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला असली तरी सुद्धा कमी मेहनत आणि जास्त परिणाम असे गुणोत्तर या त्यांच्या बाबतीत लागू होतं, म्हणूनच सुरुवातीला यांना आम्ही भाग्यवान म्हटलं होत.

या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकत. तरच नेतृत्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगला निभावू शकतात. परंतु कधीकधी अविचाराने चांगल्या संधी गमावतात आणि मग पश्चाताप करत बसतात आणि हो अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव सुद्धा आड येतो. कारण यांना दुसर्यासोबत विचारायला कमीपणा वाटतो. या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात.

या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज रत्न लाभदायक ठरतात. पिवळा, केशरी, हिरवा रंग शुभ मानले जातात. या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्याला अर्घ्य, सूर्य नमस्कार घालने, गायत्री मंत्र यासारख्या उपायांनी जरूर करावे, त्याचे त्यांना निश्चितच फायदा होईल.

ऑगस्टमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्याही मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सीतारामन, श्रीदेवी, नारायण मूर्ती, गुलजार असे नामांकित मंडळी ऑगस्टमध्ये जन्मलेली आहेत. मग काय तुमच्याकडे कोणी ऑगस्टमध्ये जन्मलेला आहे का आणि त्या व्यक्तीशी किती टक्के बरोबर आहे?कमेंट करून नक्कीच सांगा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *