केतूच्या संक्रमणामुळे या 5 राशींना मिळणार बक्कळ पैसा…

अध्यात्मिक राशिभविष्य

26 जूनला केतू ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. केतूच हे संक्रमण पाच राशीच्या लोकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम करणार आहे. या कालावधीत संबंधित राशीतील लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण कोणत्या राशी आणि यावर काही उपाय आहे? का चला जाणून घेऊया..

1. मिथुन राशी : केतूच संक्रमण जाताच ठरणारी पहिली रास मिथुन राशी आहे. केतू संक्रमण मिथुन राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनावर प्रभाव टाकू शकत. याचबरोबर, या काळात तुमच्या प्रेम जीवनात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. तर विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सुद्धा कठीण जाऊ शकत. त्याच बरोबर तुम्हाला मुलांबरोबर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तसेच या काळात मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

2. कर्क राशी: या लोकांसाठी या काळात केतू चतुर्थ भावात स्थित आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आईला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन थोडे तणावाचे होऊ शकते. घरातील वातावरण असे असेल की त्याचा तणाव तुम्हाला जाणवेल. मात्र हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. थोडा संयम तुम्हाला बाळगावे लागेल.

3. कन्या रास: केतूच्या संक्रमणाचा कन्या राशीच्या लोकांच्या वाणीवर परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल. या काळात तुमचं बोलणं थोडं धारदार होऊ शकतात. ज्यामुळे तुमच्याकडून लोकांत मन दुखावलं जाईल. गैरसमज होतील, म्हणून वाणीवर संयम ठेवा. या दरम्यान तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवू शकतो किंवा नातेसंबंधांमध्ये अंतरही निर्माण करू शकतो. तर तुमच्याकडे व्यवहाराचा परिणाम त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिभेवर आणि मनावर ठेवलं तर परिस्थिती बदलेल, हे ही तितकच खरं.

4.मकर राशी: केतूच्या संक्रमणाचे मकर राशीच्या लोकांचे घरातील वडिलधार्‍यांची वाद होऊ शकतात. या काळात तुम्हाला यश मिळवण्यास कठोर परिश्रम करावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक तणाव वाढू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विरोध होऊ शकतो, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, जिभेवर साखर ठेवा आणि डोक्यावर बर्फ ठेवा. काही काळातच चित्र बदलेल.

5. मीन राशी: या लोकांसाठी केतू आठव्या भावात स्थित आहे आणि चित्रा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने या व्यक्तींसाठी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्याची चिंता वाढू शकतात. या दरम्यान तुम्हाला आर्थिक बाबतीतही खूप सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक प्रश्न एकत्र ठेवले तर त्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे.

आता या होत्या त्या राशि ज्यांना केतूचे नक्षत्र बदलाचा परिणाम बघायला मिळेल. यावर उपाय आहे. केतुचे दैवत दत्तगुरु असल्याने तुम्ही दत्तगुरुची उपासना या काळात तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्या दत्तगुरुंच्या मंदिरात दत्तगुरुंचे दर्शन घ्या किंवा दत्तगुरु एखाद्या स्तोत्राचे पठण करा. तसेच त्याच्या एखाद्या मंत्राचा जप करा. या काळात तो तुम्हाला काहीसा फायदेशीर ठरेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *