कोणत्या व्यक्तींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती असतात त्या व्यक्तीला आपण सर्व काही सांगितल्याशिवाय आपले मन हलके होत नाही पण आपण हा विचार करत नाही की आपण आपल्या मनातल्या सर्व गोष्टी समोरच्याला सांगतो पण तो समोरचा याची चेष्टा तर करत नाही हा विचारा आपल्या मनामध्ये कधीच येत नाहीत.

आपण आपल्या आयुष्यामधील प्रसनल जरी गोष्टी असल्या तर आपण त्याना लहान मोठ्या सर्व शेअर करत असतो. तर आपल्या पूर्ण गोष्टी इतरांना सांगणे देखील खूप घातक आपल्यासाठी ठरू शकतो तर मित्रांनो आपल्याला कितीही अडचणी असल्या तरी आपण काही गोष्टी इतरांना कधीही सांगायचे नाहीत व इतरांवर डोळे झाकून कधीही विश्वास ठेवायचा नाही.

काही लोक आपल्यासमोर चांगले वागतात आणि पाठीमागे आपले बदनामी करत असतात म्हणजेच की नावे ठेवत असतात आपली खिल्ली उडवत असतात आणि आपल्याला एक एक वेळेस समजत नाही की समोरच्या व्यक्तीशी वागावं कसं. कोणत्या व्यक्तीशी कसं वागाव चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो जर तुम्ही विधुरनीती या ग्रंथा बदल कधी ना कधी ऐकलं असणारच आहे विदुर म्हणजे महाभारतामधीलच एक पात्र आहे महाभारतामध्ये विदुरांना धर्मात्मा असे म्हटले गेले आहे याचा अर्थ असा होतो की ते नेहमी प्रत्येकाशी धर्माने वागत होते ते नेहमी धर्माचा सल्ला इतरांना देत होते त्यांच्या इतकं चांगलं वागणं म्हणजेच की धर्म इतर कोणालाही कधीही जमणार देखील नाही .

त्याच विदुरांनी विदुर नीती या ग्रंथाचे रचना केलेली आहे. जेव्हा आपल्याला काही निर्णय घेता येत नाही तेव्हा आपण अशा शास्त्राच्या उपयोगाने आपण सर्व निर्णय घेऊ शकतो त्यात विदुर नीती मध्ये आपल्या उपयोगाच्या पण काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत.

कोणत्या व्यक्तीशी कसा व्यवहार ठेवल्याने आपण आपल्या स्वतःला व आपल्या परिवाराला त्या व्यक्तीपासून वाचवू शकतो त्या याबाबतच महात्मा विदुर यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मित्रांनो विदुर लोकांच्या एका स्तोत्रामध्ये विदुरांनी असं म्हटलं आहे की जो व्यक्ती धर्म अर्थ कामात कधीही घाई करत नाही.

जो व्यक्ती नेहमी योग्य व्यक्तीचा सल्ला घेत असतो आणि कोणत्याही प्रकारच्या वादाला तो बळी पडत नाही हा व्यक्ती खूप चांगला असतो आणि त्याचबरोबर जर आपला अनादर झाला तर तो व्यक्ती लगेच दुःखी होत नाही त्या व्यक्तीला सर्वोत्तम व्यक्ती मानलं जातं कारण या दोन्ही गोष्टीसाठी संयम खूप असावा लागतो आणि संयम असणे खूप गरजेचे आहे

कारण आपण अनेक गोष्टी पासून सावध देखील राहतो आणि त्यासाठी आपल्याला तितकी बुद्धिमत्ता देखील आवश्यक आहे बुद्धीचा वापर न करता आपण कोणतेही काम करू शकत नाही व धर्माचे पालन देखील करू शकत नाही आणि पैशाच्या मागे सतत धावणे हे देखील मुर्खाचं काम आहे कारण सर्व गोष्टी म्हणजेच पैसा नसतो.

आणि त्याचबरोबर जो कितीही वाईट प्रसंग आला तरी खचून जात नाही डगमगत नाही आणि खंबीरपणे प्रत्येक गोष्टीला तो सामोरे जात असतो तो माणूस नेहमी आनंदी राहतो. विदुर नीति ग्रंथामध्ये असे अनेक श्लोक आहेत जी व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी नाही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये अर्थात जी व्यक्ती आत्मविश्वास घातकी आहे.

अशा व्यक्तीवर चुकूनही विश्वास ठेवू नये व त्या व्यक्तीच्या संगतीत देखील राहू नये आणि हे जर तुम्हाला अपरिवर्तनीय सत्य असेल तरी तुम्हाला सगळ्यात विश्वासू व्यक्तीवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही. कारण विश्वास एकदा तुटला तर आनर्थ हा घडतोच म्हणून ज्या तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या इतरांशी कधीही शेअर करायचा नाहीत.

आणि जर तुम्हाला काही स्वतःच्या बाबतीमध्ये घडलेल्या गोष्टी इतरांना सांगायचे असतील काही तुम्ही भावनेच्या भरामध्ये समोरच्याला सांगत असता पण तुम्ही भावनेच्या भरामध्ये कोणतीही गोष्ट समोरच्यावर विश्वास ठेवून सांगायचे नाही तुमच्या भावनांचा समोरचा व्यक्ती सहजच गैरफायदा घेईल असं तुम्हाला कधीही वागायचं नाही.

आपण आपल्या भावनांवर नेहमी नियंत्रण ठेवायचा आहे हीच यशस्वी व्यक्तीची ओळख देखील आहे म्हणूनच मित्रांनो अशा व्यक्तीपासून आपल्याला नेहमी लांबच राहायचे आहे हे कधी आपला विश्वासघात करतील हे सांगता देखील येत नाही

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *