कोणत्याही शनिवारी देवघरात ठेवा असे कासव, स्वामींचा अखंड वास राहील…

राशिभविष्य अध्यात्मिक

श्री स्वामी समर्थ, तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जा असेल किंवा वाईट शक्ती असते तर कधी तुमच्या घरातल्या सदस्यांच स्वास्थ ही खराब राहत असेल, कोणी सतत आजारी राहत असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती नसेल, बाधा असतील किंवा कोणाच्या तरी नोकरीमध्ये बाधा येत असेल किंवा तुमच्या कोणता बिजनेस असेल तर त्या बिजनेस मध्ये तुम्हाला अशा खूप सार्‍या घटना घडतात.

असे आपल्याला वाटते की आपल्या सोबतच का होत आहेत. आणि हे आपल्यालाच का ? आपण तर एवढी सेवा करतो तरी पण का? एवढ मेहनतीचे फळ आपल्याला का मिळत नाही? याच एकच प्रमुख कारण असते ते म्हणजे घरात असलेली वाईट शक्ती! घरात असलेली नकारात्मक शक्ती ! या शक्तीमुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी येत नाही.

भरभराट येत नाही आणि पैशाची बरकत राहत नाही. त्यासाठी आपण खुप सारे उपाय करू शकतो. वास्तुशास्त्र मध्ये खूप सारे उपाय दिलेले आहेत, आपल्या केंद्रात, मठात स्वामींच्या असे उपाय सांगितले जातात. त्यातलाच एक उपाय एक सेवा आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. तुम्हाला फक्त आपल्या देवघरात हो वस्तू ठेवायची आहे.

तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कासव देवघरात ठेवला असेल. पण तो कशा रीतीने, कशा पद्धतीने, कोणत्या दिशेला ठेवला आहे ते सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरते. तुम्ही यासाठी आधी एक कासव विकत घेऊन या, कासव चांदीचा तांब्याचा किंवा काचेच्या सुद्धा असू शकतो. आता तुम्हाला जो जसा मिळेल तसा तुम्ही तो कासव घेऊन या.

एक धातू प्लेट सुद्धा तुम्हाला लागेलच. तुम्ही देवघरांमध्ये शनिवारच्या दिवशी हा कासव स्थापन करू शकतात. शनिवारच्या दिवशी सकाळी अकरा किंवा बारा वाजता तुम्हाला कासव स्थापन करावे लागेल. त्यासाठी तुम्ही कासवाला दुधाने पाण्याने धुऊन घ्या. थोडक्यात अभिषेक करा. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून ,स्वच्छ कपड्याने पुसून तसे तुमच्या उजव्या हाताला तो कासव स्थापन करायचा आहेत आणि कासवाचे तोंड हे पूर्व दिशेकडे असायला पाहिजे.

त्या प्लेट मध्ये थोडं पाणी ठेवा व त्यात कासव. अशा रीतीने तूम्ही कासव स्थापन करायचा आहे. तुमच्या हाताचा उजव्या दिशेला आणि त्याचे तोंड पूर्व दिशेला पाहिजे हे काळजी तुम्हाला घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही प्लेट मध्ये पाणी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तो कासव ठेवून उजव्या हाताला पूर्व दिशेकडे तोंड करून तो कासव तुम्हाला ठेवायचा आहे.

अशा रीतीने तुम्ही देवघरात कासव ठेवा. कासव ठेवताना ची काळजी तुम्ही घेतली आणि अशा पद्धतीने जर कासव तुम्ही तुमच्या घरात ठेवला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा अवश्य मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की धातूचा कासव घेण्याचा प्रयत्न करा. कासव धातूचा असायला पाहिजे तांब्याचा चांदीचा किंवा पितळाचा तुम्हाला जर नाही मिळाला तर मग काचेचा कासव सुद्धा चालेल.

पण प्रयत्न करावे की, आपल्या घरातील मूर्ती असतात, पितळाच्या चांदीच्या तांब्याचा तसेच देवघरामधला कासव अवश्य मार्केटमध्ये मिळतो. धार्मिक मान्यतानुसार प्रभू विष्णुंचा एक रुप कासव होता. विष्णूंनी कासवाचे रुप धारण करुन समुद्र मंथन दरम्यान मंद्रांचल पर्वत आपल्या कवचवर सांभाळले होते. जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं.

फेंगशुईत देखील कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो. परंतू त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल. नाहीतर अशुभ परिणाम हाती लागू शकतात.कासव ठेवल्याने धन प्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होते परंतू या साठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेला आहे.

तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीघार्यु प्राप्त होते आणि आजारापासून मुक्तीदेखील मिळते. कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरपासून देखील वाचवतं. याने घरात सुख-शांती नांदते. म्हणून आता तुम्ही तो घेण्याचा प्रयत्न करा आणि यामध्ये सांगितलेल्या नियमानुसार त्या पद्धतीने कासव स्थापन करा.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *