कुलदेवतेच्या ४ गोष्टी करायलाच हव्यात, कुटुंब सुखी राहते!

अध्यात्म माहिती

तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का?कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? काही माहित असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या. कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला जाणून घेऊया.

कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाचे देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते.

तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदैवते बद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळा मध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं.

मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातली आजारपण असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारण असू शकतात. आपल्या कूळाची आई आपल्या कूळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकच आवश्यक आहे.
बरं त्याची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम.

पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा.

तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नाम जप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदैवतेचा नाम जप करावा.

आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहितीच नाही तर आम्ही काय जप करायचा? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नाम जप करावा.

हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवाव. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा लाभ आपल्याला होतो.

आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहित नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता. कारण मंगळवार हा देवीचा वार आहे.

शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते.

कुलदैवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.  तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *