लग्न जुळण्यापासून ते पैशांपर्यंत होतील फायदे! फक्त करा हे उपाय

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या शास्त्रात प्रत्येक दिवसाचे असे एक खास महत्त्व असते. आपण आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टींचे योग्य पद्धतीनं पालन करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. तसेच मित्रांनो अनेकांना लग्न देखील जुळण्यामध्ये अनेक प्रकारच्या बाधा उत्पन्न होत असतात.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना पैशाच्या संबंधित देखील अनेक अडचणी येत राहतात. त्यावेळेस मित्रांनो आपण नशिबाला दोष देत राहतो. तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये चढउतार हे येतच असतात. फक्त आपण प्रत्येक अडचणींचा सामना धीराने करायचा असतो.

तर मित्रांनो मी आज तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला लग्न जुळण्यापासून ते पैशांपर्यंत काहीच अडचणी येणार नाहीत. मित्रांनो,आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्त्व असते. तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत.

मित्रांनो प्रत्येक वर हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. तर गुरुवार हा विष्णूंचा आणि बृहस्पतीचा असतो.
या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पुजा केली जाते. या दोन देवांची या दिवशी पुजा केलीत तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. जोतिषशास्त्रात या दिवसाचे महत्त्वही मोठे आहे.

त्याचबरोबर या दिवशी तुम्ही असे काही उपाय केलेत तर भगवान विष्णू आणि बृहस्पती देव प्रसन्न होतात. तर तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. मग जाणून घेऊया आपल्याला गुरूवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत. जर का तुम्हाला आयुष्यात चांगली आर्थिक भरभराट हवी असेल तर तुम्ही गुरूवार भाताची खीर बनवा आणि त्यात थोडीसे केशर घाला आणि त्याचा प्रसाद तुम्ही भगवान विष्णूला दाखवा आणि मग तो प्रसाद म्हणून तुम्ही तो स्वत:ही खाऊ शकता.

मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनलाभ हवा असेल तर तुम्ही केळ्याचे घड पिवळ्या कपड्यांमध्ये घालून गळ्यात घालू शकता. ज्यामुळे आपल्या कुंडलीतील बृहस्पतीची स्थिती ही मजबूत होते आणि कोणत्याही प्रकारचा त्रास मग आपणाला होत नाही.

मित्रांनो गुरूवार हा बृहस्पतीचा वार असतो. यामुळे जर तुम्ही केळ्याच्या झाडाची पूजा या दिवशी अवश्य करावी. हे खूपच शुभ मानले गेलेले आहे. हे आपल्यासाठी खूपच लाभदायक ठरते. पूजा झाल्यानंतर चण्याची दाळ आणि गुळ यांचा प्रसाद द्यावा. त्यानंतर झाडाभोवती तुम्ही सात परिक्रमा घाला.

असं केल्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या लग्नात काही अडचणी येत असतील सर्व अडचणी दूर होतील आणि विवाह जुळून येतील. तसेच मित्रांनो,जर तुमच्या कुंडलीत दोष निर्माण झाला असेल तर गुरूवारी बृहस्पती देवाची पूजा करा आणि तुळशीच्या माळेसोबत 108 वेळा बृं बृहस्पती नम: चा जप करावा.

तर मित्रांनो वरीलपैकी हे उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. तसेच मित्रांनो तुमचे जर लग्न जुळत नसेल तर लग्न देखील जुळून येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *