लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय नक्की करा..

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो खूप कष्ट करूनही घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नसेल यासाठी तुम्ही अनेक उपाय करून बघितला तरी देखील तुम्हाला काही फरक जाणवत नसेल किंवा तुमच्यावर अनेक संकटे येत असतील तुमच्यावर अनेक मोठ मोठया अडचणी निर्माण होत असतील तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल

तुम्ही खूप काम करून कष्ट करून देखील तुम्हाला हवा तसा पैसा देखील मिळत नसेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत गेली की मन देखील उदास होऊन जातो व आपलं मन कुठेही लागत नाही घरामध्ये उगाचच चिडचिड देखील होत असते एकमेकांमध्ये वादविवाद देखील वाढत असतात

तर लक्ष्मी प्राप्तीसाठी नेमके कोणते उपाय करायचे आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया.घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वातावरण असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होते व त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहतो घरामध्ये जर वारंवार वादविवाद होत असतील तर दूर करण्यासाठी वास्तु शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत

त्यातला पहिला उपाय आहे ते म्हणजे दिवसातून एकदा तरी घराच्या खिडक्या उघडल्या पाहिजेत असे केल्याने घरामध्ये प्रकाश येतो बाहेरचे शुद्ध हवा देखील घरांमध्ये येत असते व घरामधील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तुम्ही हे काम जर सकाळी केला तर ते तुमच्यासाठीच अतिउत्तम ठरणार आहे .

कारण सकाळच्या वेळी हवेमध्ये भूषण कमी असतो आणि हवा शुद्ध असते सकाळच्या वेळेचं वातावरणीय अगदी अल्हाददायक असतो असे देखील म्हटले जात.तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर घराचे दार व खिडक्या उघडायचे आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये खूप प्रसन्नता देखील येणार आहे.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे नेहमी उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावायचा आहे आणि त्याचबरोबर दरवाजाच्या मुख्य दरवाजासमोर श्री गणेशाची मूर्ती किंवा स्वस्तिक काढायचे आहे किंवा अशी चिन्हे लावायचे आहेत ज्या घरामध्ये सकाळी व संध्याकाळी तुपाचा दिवा लावला जातो त्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा कधीही राहत नाही .

तिसरा उपाय आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातले देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे देवघरांमध्ये अर्पण केलेले फुले हार दुसऱ्या दिवशी लगेच काढायचे आहेत घरामध्ये वाळलेल्या फुलांचा गुच्छ कधीही ठेवू नये जर तुम्ही घरामध्ये वाळलेल्या फुले किंवा हार ठेवलातर त्याच्यामुळे कुटुंबामध्ये वाद-विवाद होत असतात व अनेक अडी अडचणी देखील निर्माण होत असतात.

चौथा उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये काही विद्युत उपकरणे असतील जे नीट काम करत नसतील म्हणजेच की बंद पडलेले घड्याळ किंवा अनेक ज्या काही बंद पडलेल्या वस्तू आहेत त्या ताबडतोब तुम्हाला दुरुस्त तरी करून घ्यायचे आहेत जर दुरुस्त करून घ्यायचे नसेल तर ते तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहे .

घरांच्या भिंतींना ओलसरपणा कधीही येऊ देऊ नका व घराच्या भिंतीला तडा देखील येऊ देऊ नका यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पूर्व दिशेला भांड्यात मीठ ठेवायचे आहे हे अत्यंत शुभ देखील मानल जात मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करत. घर नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा साचू द्यायचा नाही घर नेहमी स्वच्छ असणे फार गरजेचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *