महाशिवरात्रीला केलेले हे उपाय सिध्द होऊ शकतात वरदान, धनधान्य आणि आरोग्यात होईल भरभराट!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे व्रत हे करीत असतात. अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा करीत असतात. मित्रांनो आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्यात, कोणत्याही प्रकारच्या समस्या संकटे येऊ नयेत.

तसेच प्रत्येक कामात यश मिळावे यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच देवतांची आराधना देखील करीत असतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे हे जर उपाय तुम्ही महाशिवरात्रीला केले तरी यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य, आरोग्यामध्ये भरभराट होणार आहे.

मित्रांनो महाशिवरात्री या दिवशी महादेव आणि माता-पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे. बरेच जण या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतात. तसेच या दिवशी बरेच जण उपवास देखील करीत असतात.

या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची तुम्ही पूजा करताना जल अर्पण करण्यापूर्वी त्यामध्ये काळे तीळ मिसळायचे आहेत आणि तीळ मिसळून शिवमंत्राचा जप करायचा आहे. असे केल्याने भगवान शंकर हे लवकर आपल्यावर प्रसन्न होतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी दह्याने भोलेनाथाचा रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने व्यक्तीच्या आर्थीक समस्या दुर होतात आणि जीवनात प्रगती होते. मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी शनि देवाची पूजा करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. याशिवाय शिव चालीसा आणि शनि चालीसा पाठ करणे गरजेचे आहे. यामुळे मित्रांनो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना बरेच लोक हे शिवलिंगाला चंपा किंवा केतकीची फुले अर्पण करतात. परंतु मित्रांनो असे करणे शुभ मानले जात नाही. यामुळे मित्रांनो तुम्ही भगवान शिवाला शमी आणि बेलाची फुले अर्पण करायचे आहेत. कारण ही फुले त्यांना खूपच आवडतात.

तसेच मित्रांनो, भगवान शंकराच्या पूजेमध्ये जवसाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल आणि पांढरी फुले विशेषतः अर्पण केली जातात. या वनस्पतीला मदार असेही म्हणतात. याशिवाय शिनवलिंगावर बेलपत्र, धतुरा आणि मध अर्पण करा.

तसेच या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते. म्हणूनच महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा किमान 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करणे देखील शुभ आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *