महिला नाकात नथ का घालतात? यामागचे कारण जाणून घ्या

अध्यात्मिक

मित्रांनो, सौभाग्यवत स्त्रियांनी वापरावयाच्या अलंकारांस सौभाग्यालंकार असे म्हणतात. या अलंकारांनी त्यांच्या रूपामध्ये खूपच भर पडली जाते. सौभाग्यालंकार घालण्याची ही आपली पारंपरिक पद्धत आहे. परंतु अलीकडच्या या फॅशनच्या युगामध्ये अनेक स्त्रिया या फॅशनेबल राहतात. मंगळसूत्र, चुडे , नथ, जोडवी, गेंद, विरोल्या , मासोळ्या इ. अलंकार हे सौभाग्यालंकार म्हणून गणले जातात.

त्यापैकी एक म्हणजे नथ. लग्नानंतर महिला या नाकामध्ये नथ घालीत असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये नथ अजिबात महिला घालत नाहीत. फक्त फॅशन म्हणूनच या आपल्या नाकामध्ये नथ घालीत असतात. परंतु मित्रांनो नथ घालण्या पाठीमागचे कारण नेमके कोणते आहेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही.

तर मित्रांनो नाकामध्ये नथ का घालावी याविषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. हिंदू धर्मात अनेक शतकांपूर्वीपासून स्त्रियांना नथ घालण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर आजच्या आधुनिक जीवनशैलीतही लग्नानंतर महिला नाकात नथ घालणे पसंत करतात.तर मित्रांनो नाकात नथ घालने हे आपल्या लग्नाचे लक्षण मानले गेलेले आहे. यामुळे लग्नात नथशिवाय कोणत्याही नवरीचा मेकअप अपूर्ण वाटतो.

त्याचबरोबर लग्नानंतरही नथ घालणे हा महिलांच्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग बनतो.तसेच हिंदू धार्मिक विधींमध्ये स्त्रियांच्या सोळा अलंकारांचे वर्णन केले आहे. त्याच वेळी, नाकातील नथला सोलह शृंगारचा एक महत्त्वाचा भाग देखील म्हटले जाते. अशा वेळी अनेक लोक नथला सौभाग्याचे प्रतीक मानतात.

तसेच मित्रांनो मासिक पाळीदरम्यान महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. भारतीय आयुर्वेदानुसार, नाकाच्या एका भागात छिद्र पडल्याने मासिक पाळीचा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो. म्हणूनच महिलांनी नाकात नथ घातल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.तसेच भारतीय आयुर्वेदानुसार स्त्रियांच्या नाकपुड्या प्रजननाच्या अवयवांशी जोडलेल्या असतात.

अशा स्थितीत नाकाची नथ घातल्याने प्रसूतीच्या वेळी जो त्रास होतो तो त्रास कमी होतो आणि प्रसूतीमध्ये कोणताही धोका नसतो.नाकात नथ घालणे पौराणिक मान्यतेनुसार, महिलांनी लग्नापूर्वी नाकात नथ घालणे योग्य नाही. मात्र, आता नथ घालणे ही एक फॅशन झाली आहे. त्यामुळे सर्व महिला नथ घालतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *