महिलांनी अंत्यसंस्कारासाठी स्मशानात का जाऊ नये?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी, परंपरा खूप वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. या परंपरांचे बरेच जण पालन करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर बरेच जण हे अंधश्रद्धा म्हणून त्याकडे दुर्लक्ष देखील करीत असतात. परंतु हिंदू धर्मामध्ये ज्या काही परंपरा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्यांना खूपच महत्त्व देखील आहे.

या परंपरांमध्ये काही कारणे देखील दडलेली आहेत. तर हिंदू परंपरेनुसार कुटुंबातील एखादा सदस्य मृत्यू झाल्यावर त्यांना स्मशानभूमीवर अग्नीदाह देऊन अंत्यसंस्कार करण्यात येतो. महिलांनी स्मशानभूमीवर जाण्यास बंदी आहे. परंतु या मागचं कारण नेमकं काय आहे हे बहुतांशी लोकांना माहीत नाही.

तर स्त्रियांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानात जाण्यास परवानगी का नाही? तर या मागचं आज आपण कारण जाणून घेणार आहोत.तर घरातल्या कोणत्याही पुरुषाचा किंवा स्त्रीचा मृत्यू झाला तरी घरातल्या महिला त्यांना अंगणापर्यंतच पोहचवतात. स्माशानभूमीवर फक्त पुरुषच जातात. यामागचं शास्त्रात काय कारण सांगितलं आहे हे आपण आता जाणून घेऊया.

हिंदू संस्कृतीत मुल जन्माला आल्यापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत वेगवेगळे एकूण १६ संस्कार सांगण्यात आले आहेत. त्यातला शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार स्मशान घाटावर नकारात्मक उर्जा निर्माण होते. ती महिलांवर लवकर हावी होऊ शकते. यामुळे महिलांना अज्ञात आजार होऊ शकतात.

महिला या अतिशय खूपच भावुक असतात. त्या कोणाच्याही मृत्यूने लगेचच जास्त आक्रोश करतात. अशामध्ये स्मशानभूमी मृत व्यक्तीला अग्नीदाह देताना बघून त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यांच्या या आक्रोषाचा त्रास मृत व्यक्तीच्या आत्म्याला होतो आणि त्याला गती मिळायला त्रास होतो.

जेव्हा प्रेत जाळले जाते तेव्हा अनेक विषारी किटाणू वातावरणात मिसळतात. म्हणून पुरुष टक्कल करून नदीत आंघोळ करून शुद्ध होतात. पण हिंदू धर्मात स्त्रियांनी केस कापण्यास अशुभ मानले आहे. स्माशानभूमीवर अतृप्त आत्म्याचा वास मानला जातो. महिला कोमल हृदयाच्या असल्याने त्यांच्यावर हे आत्मे लवकर हावी होऊ शकतात.

म्हणून महिलांनी स्मशानभूमीवर जाणे वर्ज्य आहे. स्मशानभूमी मध्ये येण्यास परवानगी दिली जात नाही. परंतु आता काळानुसार आपण बदल बघू शकतो की महिला हल्ली स्मशानभूमीवर जाऊ लागल्या आहेत आणि मुली देखील अग्नी देऊ लागल्या आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *