मकरसंक्रांतीला शनि-सूर्य युती झाल्याने ‘या’ राशींवर येणार मोठे संकट? पुढील ११ दिवस जरा जपूनच नाहीतर..

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मकर संक्रांती हा सण साजरा होणार आहे. मकर संक्रांतीला अनेक प्रकारचे दान केले जाते. तसेच सौभाग्यवती महिलांसाठी हा दिवस खूपच खास असतो. तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच कधी आपणाला सुखाचे दिवस येतात. तर कधी दुःखाचे दिवस येतात.

तर मित्रांनो या गृह नक्षत्रांच्या बदलत्या काळामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसून येत असतो. तर मित्रांनो मकर संक्रांतीला शनी सूर्य युती झाल्याने काही राशीवर याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. म्हणजेच काही राशींवर खूप मोठे संकट देखील उद्भवणार आहे. तर नेमकं कोणत्या राशीला मकर संक्रांतीनंतर अकरा दिवस हे खूपच जपून राहावे लागणार आहे. कोणत्या राशींवर त्याचा काय परिणाम होणार म्हणजेच कोणत्या राशींना नक्की मोठे संकट येणार आहे याविषयी माहिती आपण जाणून घेऊया.

तर 14 जानेवारी या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशि मध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य आणि शनिदेव यांची भेट होणार आहे. यामुळे काही चार राशींना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. काही राशीवर खूपच वाईट परिणाम याचा दिसून येणार आहे.

मकर ही शनीची राशी असल्यामुळे याचा काही परिणाम आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. दुसरीकडे, १७ जानेवारी २०२३ रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. यावेळी मिथुन आणि तूळ राशीचा शनिची साडेसती संपेल आणि कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिची साडेसती सुरू होईल. दुसरीकडे धनु राशीचे लोक शनि धैय्यापासून पूर्णपणे मुक्त होतील. मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनि साडेसती सुरू राहील.

सिंह राशीच्या लोकांनी सूर्याच्या संक्रमणादरम्यान आपल्या आर्थिक स्थितीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त पैसे इतर कोणालाही द्यायचे नाहीत. कारण जर तुम्ही असे केलात म्हणजेच गरजेपेक्षा जास्त पैसे इतरांना दिलात तर यामुळे तुमचे खूपच आर्थिक नुकसान या काळामध्ये होऊ शकते. सर्व कामे तुमचे बजेट लक्षात घेऊनच करावी लागतील. या काळात तुम्हाला काही बातम्या मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन दु:खी होईल.

तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सूर्याच्या संक्रमणामुळे प्रभावित होईल. या काळामध्ये या राशीतील कुटुंबांमध्ये वादविवाद तसेच मतभेद देखील होऊ शकतात. यामुळे सर्वांनाच खूपच मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच नातेवाईकांकडून तसेच मित्रांकडून देखील काही वाईट बातम्या यांना ऐकावयास मिळू शकतात.

या काळामध्ये या राशीतील लोकांनी प्रवास करताना खूपच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या काळामध्ये या राशीतील लोकांचे सामान चोरी देखील होऊ शकते. तसेच या राशीतील लोकांनी आपल्या आई-वडिलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या काळामध्ये या राशीतील लोकांच्या सरकारी कामांमध्ये खूपच विलंब होऊ शकतो. यामुळे या राशीतील लोकांनी संयम बाळगायला हवा.

धनु राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणात काही अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. या काळात तुमचे कोणतेही रहस्य कुणाला सांगू नका. या काळात आरोग्याची अधिक काळजी घ्या. या काळात तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यावेळी, कुटुंबाकडे लक्ष द्या आणि नातेसंबंधात अंतर येऊ देऊ नका.

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण काही विशेष शुभ राहणार नाही. सूर्याच्या या अशुभ प्रभावामुळे या राशीतील लोकांना खूपच धावपळ करावी लागणार आहे. तसेच या काळामध्ये या लोकांचा खूपच खर्च देखील होणार आहे. यांना खूपच जास्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती खालावली जाऊ शकते.

तसेच तुमच्याबद्दल वाईट विचार जे लोक करत होते त्यांना कुठेतरी यश मिळताना तुम्हाला पहावयास मिळणार आहे. त्यामुळे आपापसातील जे काही वादाची प्रकरने आहेत ही प्रकरणे मिटवणे तुमच्यासाठी खूपच उत्तम ठरेल. ते शहाणपणाचे ठरेल. तसेच तुम्ही कर्जाच्या स्वरूपात कोणालाही जास्त पैसे द्यायचे नाहीत. कारण यामुळे तुमचे आर्थिक नुकसान खूपच होणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *