मानस सरोवर कधीच न उलगडलेलं रहस्य!!!

अध्यात्म माहिती

भगवान शिवशंकराचे निवासस्थान कैलास पर्वत आणि याच कैलास पर्वत मानसरोवर आहे. हे मानस सरोवर दिव्य आहे असा अनुभव तिथे जाणाऱ्यांना येतो. अनेक रहस्ये मानस सरोवर भोवती फिरत असतात. त्या रहस्यांचा उलगडा आजही वैज्ञानिकांना झालेला नाही. चला तर मग त्यांचा मागोवा घेऊ..

हिमालयाचं कैलास पर्वतरांगेमध्ये एक नयनरम्य सरोवर आहे. हिंदूंच्या 51 शक्तिपीठ एक पवित्र तीर्थस्थान आहे. हे सरोवर तिबेटच्या नैऋत्य भागात आणि नेपाळच्या वायव्येस आहेत. या सरोवराचा आकार अंडाकृती असून त्याच्या उत्तरेला कैलास पर्वत आहे आणि पश्चिमेला राक्षसताल नावाचं आणखी एक सरोवर.

जगातील सर्वाधिक उंचीवर आणि स्वच्छ तसेच गोड्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर ओळखले जातात. मात्र ,सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सरोवराच्या ओळख इतकीच मर्यादित नाही.या परिसरात ओम आणि डमरूचा आवाज आजही कानात घुमट असतो असे येते जाणारे यात्रेकरू सांगत असतात. या आवाजाचा उगम आजपर्यंत कोणालाही कळू शकलेला नाही.

पण शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या आधारे असे सांगितले जात की, वारा पर्वतांवर आढळतो बर्फ वितळतो तेव्हा आवाज निर्माण होतो. एवढेच नाही तर पर्वताच्या वरच्या आकाशात विशेष दिव्य प्रकाश असतो असंही सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, मानस सरोवराच्या आजूबाजूला अनेक खास गोष्टी घडत असतात. तुम्ही त्या अनुभवू शकतात.

हा तलाव सुमारे तीनशे वीस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. या तलावाच्या आजूबाजूला पहाटे अडीच ते पावणे चारच्या दरम्यान अनेक प्रकारच्या अलौकिक आणि दिव्य गोष्टी घडतात. ज्या केवळ फक्त अनुभवता येतात. असं वर्णन अनेक यात्रेकरूंनी आणि साधू-संतांनी केलेले आहे.

या मानस सरोवराचे उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मनापासून झाली त्यामुळे त्याला मान सरोवर हे नाव पडलं असावं. असा वाल्मिकी आणि इतर काही पुराणांमध्ये उल्लेख आहे. भगवान श्रीहरी विष्णू होता मानस सरोवरात मत्स्यावतार धारण केल्याचा उल्लेख वामन पुराणात सापडतो. पाली आणि इतर साहित्यात या सरोवराचा उल्लेख आढळतो.

मानस सरोवराच्या पश्चिमेस दहा किलोमीटरचा राक्षसताल नावाचं आणखीन एक सरोवर आहे. ते मानस सरोवरापेक्षा मोठा आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी रावणाने या सरोवराच्या काठी तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच त्यावरूनच या सरोवराला राक्षसताल हे नाव पडलं, असं मानले जातात.

प्रत्यक्ष मानसरोवर आतून कोणत्याही नदीचा उगम होत असल्याचे दिसत नसलं तरी सुद्धा सरोवराचे पाणी भूगर्भातून दूरवर जाऊन मग पृष्ठभागावर येत आणि तेच एखाद उगमस्थान ठरते. शरयू, ब्रह्मपुत्रा या अशा नद्यांचा उगम मानसरोवर आतूनच झालाय असंही सांगितलं जातं. मानस सरोवराचे पाणी निळसर दिसत.

सरोवराचा वरचा पृष्ठभाग बर्फाच्छादित असला तरी सुद्धा त्याच्या तळाशी मात्र गरम पाण्याचे झरे वाहतात, हेही एक आश्चर्यच. हंस पक्षांविषयी हे सरोवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. अनेक काव्यपंक्तीतून हे सरोवर आणि त्यातील हंस यांची वर्णन करण्यात आलेले आहे. पांढरे शुभ्र राजहंस आणि मातक पांढरे किंवा बदामी रंगाचे हंस आनंदाने विहरत असतात. जे सरोवराच्या सौंदर्यात भर घालतात.

या सरोवराच्या किनाऱ्यावर सश्याचे कळप बागडत असतांना दिसून येतात. सूर्योदय आणि सूर्यास्त यांची हिमाच्छादित पर्वत रांगा आणि त्यातून चांदण्या या सगळ्याच सरोवरातील प्रतिबिंब अत्यंत विलोभनीय दिसतं. त्यामुळे त्याला सरोवरांची राणी असंही म्हटलं जातं. मानस सरोवराच्या काठावर पांढरी रेती आढळते. भारतीय संशोधकांनी या भागात संशोधन केलं त्यांना राक्षसताल आणि मानसरोवर यांच्यात काही प्रमाणात सोनं आणि अनेक दुर्मिळ खनिजांचे साठे आहे असे जाणवलं आहे.

भाविकांच्या मते या सरोवरात स्नान केल्याने या सरोवरात जल सेवन केल्यास असं केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. त्यामुळेच दरवर्षी अनेक भाविक सरोवराची यात्रा करतात. मानस सरोवराच्या उत्तरेला अवघ्या बत्तीस किलोमीटरवर कैलास हे हिंदूं लोकचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हिमालयात अनेक पाऊलवाटा कैलास पर्वताकडे आणि मानस सरोवराकडे जातात.

प्रवासात घोड्यांचा वापर करावा लागतो. या भागांत व्यतिरिक्त मोठ्या वनस्पती फारशा आढळत नाहीत. चीनच्या अधिपत्याखाली तिबेट आल्यापासून आणि विशिष्ट हा भारत-चीन संघर्ष पासून भारतीयांना कैलास मानसरोवरला यात्रेला जाण्याचा फारच बंधने पाळावी लागतात. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा कितीही त्रास झाला, कितीही कष्ट पडले तरी सुद्धा भाविक मानस सरोवर यात्रा करतात.

मानस सरोवराचा हा परिसर म्हणजे एका दुसऱ्या जगाशी संपर्क साधण्याचा केंद्राच असावं असे अनेक लोकांचे म्हणणे आहे व अनेक साधू-संतांचे याबाबतीतले अनेक दिव्य अनुभव आहेत. तुम्ही यात्रेला जरी गेला तरी प्रत्येकाचा येणारा अनुभव हा वेगळा असेल. जी व्यक्ती स्वतः मध्ये सतत गुणांची वाढ करते, साधना वाढवते अशा व्यक्तीला मानसरोवर मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारं एक साधन ठरतं आणि अनेक लोक यालाच मोक्षप्राप्तीचा मार्ग ही समजतात. मित्रांनो यामध्ये अनेक दंतकथा, मान्यता, समज-गैरसमज वास्तविकता या सगळ्याच गोष्टींची सरमिसळ आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *