..म्हणून घरात श्रीकृष्णाची मूर्ती असावी; या रुपांमध्ये चित्र असण्याचा होतो विशेष फायदा

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते आणि आपण देवी-देवतांची अगदी विधिवत पूजा अर्चना करीत असतो. आपल्या घरातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना देखील करीत असतो. आपल्या देवघरांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती देखील पाहायला मिळते.

तर घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असावी का आणि ती कोणत्या रूपामध्ये असावे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल चला तर मग जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्णाची प्रत्येक रूपात, प्रत्येक अवतारात पूजा केली जाते आणि त्यांचे भक्तांना आशीर्वाद प्राप्त होतात.

त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने आपणाला अनेक फायदे होत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार संतानसुख मिळवायचे असेल तर घराच्या पूर्व दिशेला बाळ गोपाळाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा.असे केल्याने मुलांचे सुख प्राप्त होते असे मानले जाते.

जर आपल्या घरामध्ये राधा कृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास पती-पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. तसेच घरामधील असणारा ताणतणाव दूर होतो आणि प्रेम वाढण्यास मदत होते. राधाकृष्ण हे प्रेमाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे पती-पत्नी मधील नाते जर सुधारायचे असेल तर राधा कृष्णाची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये अवश्य ठेवावी.

आपल्या घरामध्ये बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्यास घरामध्ये सुख शांती राहते. तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आत्मविश्वास देखील वाढीस लागतो. अर्जुनाला गीतेचे ज्ञान देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे चित्र किंवा मूर्ती लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये कामात आत्मविश्वास वाढतो.

परस्पर स्नेह आणि विश्वास निर्माण होतो. तसेच गोवर्धन पर्वत घेऊन जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवणे हे संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. यामुळे अज्ञात घटनेच्या भीतीपासून किंवा अज्ञात संकटापासून संरक्षण मिळते असे मानले जाते. मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील आपल्या घरामध्ये राधा कृष्णाची तसेच श्रीकृष्णाची मूर्ती अवश्य ठेवावी. करून आपणाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *