…म्हणूनच बुधवारच्या दिवशी मुलीला सासरी पाठवले जात नाहीत !!

अध्यात्मिक माहिती

आपल्या प्रवासात कुठल्याही प्रकारचा त्रास नको म्हणून लोक बरेच उपाय करत असतात. त्यामध्ये बर्‍याच लोकांचा प्रवास हा सुखदायक ठरतो तर बर्‍याच वेळा प्रवास फारच जास्त प्रमाणात कष्टकारक असतो. अशी मान्यता आहे की, हिंदू धर्मातील शास्त्रानुसार असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी प्रवास करणे टाळले पाहिजे.

त्याच प्रमाणे हिंदू धर्मातील ज्योतिष्यामध्ये नवविवाहित मुलींबद्दल देखील अशा काही गोष्टी सांगितल्या जातात की, खास करून ज्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नाहीत त्यानी कधीच मुलींना बुधवारी सासरी पाठवू नये. कारण माहितीनुसार, बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात. कारण नवीन वधूचे बुधवारी प्रवास करणे अशुभ मानले जाते.

तसेच आपल्या देशात सर्व प्रकारच्या तसेच विविध धर्माचे लोक आहेत आणि प्रत्येक धर्माची स्वतंत्र अशी परंपरा आणि रूढी आहे असे सांगितले जाते. मुलीचे लग्न झाल्यानंतर तीची पाठवणी असते तसेच जेव्हा ती माहेरी येते आणि परत सासरी जाते, तेव्हाही तिची पाठवणी केली जाते. पण हि पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी या बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये.

कारण त्याची काही शास्त्रात महत्वाची कारणे सांगितली आहेत. यामध्ये हिंदु शास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो. तसेच जर बुधवारी मुलीला सासरी पाठवले गेले तर अनेक अपशकून होऊ शकतात, त्यामध्ये असे केल्याने त्या नवविवाहित मुलीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

यामुळे तुमचे जीवन दुःखी होऊ शकते. जर मुलीच्या पत्रिकेत बुध ग्रह भारी असेल तर अजिबात बुधवारी हे काम करू नये. तसेच दुसरे कारण म्हणजे विवाहित मुलगी आपल्या सासरी बुधवारच्या दिवशी गेल्यास तिच्या सासरच्या नात्यांवर परीणाम होण्याची शक्यता असते. मुलीच्या लग्नानंतर प्रत्येक आई वडीलांना वाटत असते की, आपल्या मुलीला सासरी योग्य वागणूक दिली जावी.

तसेच आपली मुलगी ही सासरी खुष राहावे. जर बुधवारी कधीही मुलीला सासरी घालवले आणि जर तिचा बुध ग्रह भारी असेल तर असे केल्याने तिच्या प्रवासात अनेक प्रकारच्या अडचणी किंवा वाईट प्रसंग येण्याची शक्यता असते. तसेच तिच्या आरोग्यावर वाईट परीणाम होण्याची शक्यता असते, म्हणूनच माहेरी आलेल्या मुलीला सासरी बुधवारी पाठवण्याची चूक कधीही करू नये.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *