मृत्यपूर्वीचे ४० सेकंद आधी काय होत? काय सांगत गरुड पुराण?

अध्यात्मिक माहिती

मृत्यूचे नाव ऐकले की मनात भीती निर्माण होते. मात्र मृत्यूबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता ही असते. मृत्यू पूर्वी माणसाचं काय होतं? यावेळी मरणाऱ्याच्या मनात काय विचार येत असेल? आणि कोणत्या कारणाने त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आल्याच नातेवाईकांना कळत असेल? असे बरेच प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी नक्कीच आले असतील. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

जन्म आणि मृत्यू हे एक असं चक्र आहे जे अविरत चालू राहतं. ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत सारं काही गरुड पुरानात सामावलेल आहे. मृत्यूला हुलकावणी देता येत नाही. क्वचित कधी मृत्यू सामोरा येतो आणि दिशा बदलतो कुठल्या ना कुठल्या कारणाने आडोशाला जातो.

मात्र त्याच जाण क्षणिकच असते, पुन्हा तो परततो एखाद्या अवचित क्षणी. अशावेळी माणूस भांबवून जातो. मृत्यूच्या कवेत अलगद शरीर जाते. जी माणसं दीर्घायु असतात आणि अन्यायाच्या तुलनेने अधिक समाधानी असतात त्यांना मृत्यूचे स्वागत करायला भय वाटत नाही. मृत्यूचा क्षण आला की ते शांतपणे मृत्यूचा स्वीकार करतात.

जीवनाच्या पडद्याआड होण्यात त्यांना दुःख होत नसत. जाताना आपण कुणाला पीडा दिली नाही, कुणाचा मत्सर केला नाही, आपल्या सुखात आणि दुखात राहिलो, आपण कुणाला भार झालो नाही, आपण कुणाचे ऋण वागविले नाही, कुणाचा मानभंग केला नाही, सभ्यतेचे कधी उल्लंघन केले नाही, खूप जगलो, समाधानाने जगलो म्हणून मरणाचे भय कधीच वाटलं नाही. अशी माणसं तत्त्वज्ञानाप्रमाणे बोलतात.

कालभैरव हा देवता महादेवाचेच रूप. मृत्यूपूर्वी हा काळ संपूर्ण आयुष्यातील कर्म अनंत गतीने डोळ्यासमोर ठेवतो असं गरुड पुराण सांगतात. मृत्यू कसाही असो प्रत्येकाला या यातना सहन कराव्या लागतात. तुमचा मृत्यू कोणत्या ना कोणत्या आजाराने झाला किंवा वृद्धापकाळा मुळे झाला प्रत्येक परिस्थितीत या भैरवी यातना मानवी शरीराला न्याय देतात असे म्हटले जाते.

माणसाची मृत्यूच्या अवघ्या चाळीस सेकंदा आधी मनुष्य भैरवी यातनेतून जात असतो असं म्हटलं जातं. मरण पावलेल्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगण्यास लावतो त्यांना भैरवी यातना म्हणतात. ज्यामध्ये 40 सेकंदात माणसाची मागील जन्मापासून ते या जन्मापर्यंतची सर्व कर्मे आणि या 40 सेकंदात अनेक जन्म त्याच्या डोळ्यासमोरून वेगाने फिरतात.

सर्व कर्म इतक्या वेगाने फिरत असल्यामुळे हा काळ अत्यंत क्लेशदायक मानला जातो. त्याला भैरवी यातना म्हणतात. यातना म्हणजे वेदना दुःख आणि त्रास ज्या यातना मनुष्याला भोगावे लागतात त्याच असतात. त्या चाळीस सेकंदात काळ त्याच्या वेगवान गतीने धावतो.

मरणारा माणूस या काळात आपल्या सर्व जन्माची कर्मे पाहतो आणि नंतर शरीर सोडून जातो असं बोललं जातं. मृत्यू हा अटळ असला तरी तो एका दिवसात येत नाही मृत्यू रोज हळूहळू येतो आणि एक दिवस पूर्ण होतो आणि जीवन जगण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असं सांगितलं जातं.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *