नागपंचमीला करा “हे” सोपे उपाय कालसर्प दोष दूर होतील

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये नागपंचमी हा खूप मोठा सण असतो.दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात.

धार्मिक मान्यतेनुसार असे म्हणले जाते की पृथ्वीचे वजन शेषनागाने पेलले आहे तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीहीन देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते जेणेकरून सापांची भीती राहू नये मित्रांनो नागपंचमीला कोणती साधी सोपी उपाय करायचे चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे.पाहिला उपाय आहे तो म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर या वर्षी नागपंचमीला नागाची पूजा करायची आहे.सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळामध्ये नाग पंचमीला मोठा उत्सव असतो. तेथे किंवा नाग मंदिरांमध्ये पूजा करून दर्शन घेतल्याने कालसर्प दोष नाहीसा होतो आणि सापांचे भिती निघून जाते.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिना चांगला मानला जातो कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी योग्य ज्योतिषाकडून राहुकालातील भगवान शिवाची पूजा करायची आहे.भगवान शंकराच्या कृपेने कालसर्प दोष दूर होतो

तिसरा उपाय आहे तो म्हणजे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या किंवा नागपंचमीला चांदीच्या नाग आणि नागाच्या जोडीची पूजा करायची आहे.त्यानंतर कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी आणि मूर्ती नदीच्या पाण्यात सोडायचे आहे.कालसर्प दोषाची भीती नाहीशी होईल.

चौथा उपाय आहे तो म्हणजे कालसर्प दोष असलेल्या लोकांनी भगवान शंकरांची पूजा करायची आहे.आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे. भगवान शंकराचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे.

पाचवा उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्याने कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते पण लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाची अशी मूर्ती किंवा चित्र असावे ज्यामध्ये त्यांनी मोराचा मुकुट धारण केला तसेच उज्जैनचे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष शांत होतो. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *