नवरात्रीत दुर्गा देवी होडीत बसून येणार, जाणून घ्या वाहनाचे शुभ अशुभ परिणाम

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे करीत असतात. आपापसातील मतभेद विसरून प्रत्येक जण प्रत्येक सणांचा आनंद घेत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र नवरात्रीला देखील खूपच विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. चैत्र नवरात्रीला प्रत्येकाच्या घरामध्ये देवी दुर्गा आणि कुलस्वामिनींच्या पूजेसाठी घाईगडबड गोंधळ हा सुरूच असतो. चैत्र नवरात्री चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरू होते आणि नवमीला संपते.

यंदा चैत्र नवरात्रोत्सव 22 मार्चला सुरु होणार असून 30 मार्चपर्यंत असणार आहे. या नऊ दिवसात देवीच्या विविध रुपांची उपासना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी दुर्गा या काळात भक्तांमध्ये वास करते. तसेच पूजा उपासनेमुळे प्रसन्न होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करते.

शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदू नव वर्ष 2080 विक्रम सांवत सुरु होणार आहे. नवरात्रोत्सव 30 मार्च 2023 रोजी रामनवमीला संपणार आहे. यावेळी देवी दुर्गा होडी या वाहनावर आरुढ होऊन येणार आहे. या मातेच्या वाहनावरून आपणाला अनेक शुभ संकेत देखील सांगितले जातात. यावर्षी देवीचे वाहन हे होडी असल्याने याबाबतीतील शुभ अशुभ परिणाम होत असतात.

होडी वाहन असल्याने यावर्षी खूप पाऊस होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आपणाला कोणत्याही प्रकारची आर्थिक टंचाई भासणार नाही. म्हणजे पाऊस भरपूर होणार आहे पाऊस असल्याने आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन अन्नटंचाई अजिबात जाणवणार नाही.

नवरात्रीमध्ये घरोघरी घट बसवले जातात. या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी स्नान करून कलश स्थापन करायचा असतो. कलश स्थापना करण्यापूर्वी एका लाल कपड्यावर देवीची प्रतिमा स्थापित करायची असते. त्यानंतर एका भांड्यात लाल माती टाकून गहू टाकायचे असतात. त्या भांड्यामध्ये कलश ठेवण्याची जागा ठेवायची आहे.

कलश मधोमध ठेऊन त्यावर स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे असते. कलाशाला कुंकू लावून टिळा लावा. कळश गंगाजलाने पूर्ण भरा. त्यानंतर कळशात सुपारी, फुलं, अत्तर, पाच रत्न, नाणी आणि पाच प्रकारची पानं ठेवा. पानं कळशाबाहेर राहतील याची काळजी घ्या. त्यावर थाळी ठेवून पूर्णपणे तांदळाने भरा.

लाल कपड्यात नारळ गुंडाळून रक्षासूत्राने बांधा. हा नारळ आपल्याकडे तोंड करून तांदळाने भरलेल्या थाळीवर ठेवा. देवीदेवतांना आव्हान करून कळश पूजा करा. कळशाला टिका लावा, अक्षता वाहा, फुलं वाहा, अत्तर आणि नैवेद्य आणि फळ-मिठाई अर्पण करा.तसेच गहू पेरलेल्या ठिकाणी नियमित पाणी टाका. एक दोन दिवसानंतर अंकुर फुटताना तुम्हाला दिसतील.

यावर्षीच्या नवरात्रीमध्ये मातेचे वाहन होडी असल्याने पाऊस भरपूर असणार आहे. पाऊस काळ चांगला राहिल्याने तुम्हाला कोणतीही महागाई तसेच आर्थिक टंचाई भासणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *