पती पत्नीचे सतत वाद होत असतील तर करा हे उपाय

अध्यात्म माहिती

मित्रांनो ज्या घरामध्ये सतत कोणाचाही वादविवाद होत असतो किंवा भांडण चिडचिड होत असते त्या घरामध्ये शांतता नसते, आनंद नसतो आणि अशा घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही. देवांची कृपा होत नाही म्हणून कोणत्याही घरामध्ये वादविवाद होणे कधीही चांगले नसते. परंतु ज्या घरात पती-पत्नीचे पटत नसते त्या घरात गरिबी आणि दरिद्र येत असते.

म्हणून पती पत्नीने कधीही वाद करू नये. एकानी तरी शांत रहावे. ज्या घरात पती-पत्नीचे पटत नसेल सारखे वाद होत असतील किंवा दोघांमधून कोणीतरी खूप चिडचिड करत असेल तर हा सोपा उपाय करावा. या उपायाने चिडचिड बंद होते. पटत नसेल तर पटायला लागते. वाद होणे बंद होतात. भांडण होत नाही. खास करून दोघांमध्ये सामंस्य निर्माण होत असते.

तुम्हालाही असं वाटतं की आपल्या घरामध्ये भांडण होतात. पती-पत्नी नसेल पण दुसऱ्या कोणाचे भांडण होतात किंवा कोणीतरी घरात चिडचिड करते किंवा घरात दोन लोकांचे वाद होतात किंवा पती-पत्नीचे वाद होतात तर तुम्ही पण हा उपाय नक्की करा. यानी लगेचच फरक जाणवतो.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी फक्त एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात बसायचे आहे. ते पाणी स्वामी समर्थांच्या समोर किंवा आपल्या देवघरात ठेवायचे आहे. आणि एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. रोज संध्याकाळी एक ग्लास पाणी ठेवून तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे.

तारक मंत्र बोलून झाल्यानंतर ज्याही दोन लोकांचे भांडण होते किंवा पती-पत्नीचे पटत नसते किंवा जो ही व्यक्ती चिडचिड करत असतो त्याला ते पाणी प्यायला द्यावे. जर पती-पत्नीचे पटत नसेल तर दोघांनी थोडे थोडे पाणी प्यावे आणि जर कोणाला शंका होईल की हे कसले पाणी आहे हे पाणी का देत आहे तर याचा सरळ उपाय आहे की आपले सगळ्यांचे जेही पिण्याचे पाणी असते.

माठ असते किंवा बॉटल असतात किंवा कुठेतरी पाणी आपण पिण्याचे भरून ठेवतो त्यामध्ये ते पाणी मिक्स करायचे. ते ग्लासातले पाणी त्यात टाकून द्यायचे म्हणजे सगळेच लोकं ते पाणी पितील आणि कोणाचीही चिडचिड होणार नाही. सगळ्यांच्या आपापसामध्ये पटायला लागेल. वाद-विवाद होणार नाही. तर नक्की हा एक उपाय तुम्ही करा फायदा होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *