पतीची प्रगती होत नसेल तर महिलांनी करा हा उपाय

अध्यात्म माहिती

पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात पतीचे किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी करावा हा एक उपाय करावा. याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल.

आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल, मजबूत होईल, घरात बरकत होऊ लागेल, सुख समृद्धी येऊ लागेल. तुम्हाला या उपायाने 100% लाभ मिळेल. फक्त घरातल्या महिलांनीच हाउपाय करावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे.

तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीचा दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी. घरी असलेली पूजेत वापरली गेलेली सुपारी अजिबात वापरू नये. तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायची आहे. ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी.

देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून तिची पूजा करावी. अगरबत्ती, दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे समोर ती सुपारी ठेवली असेल तर सुपारीच्या समोरच बघत तुम्हाला 21 वेळेस एक मंत्र बोलायचे आहे. तो मंत्र काही असा आहे, ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ तुम्हाला हा मंत्र 21 वेळेस बोलायचा आहे.

मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची. ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारात लावायची आहे. म्हणजे मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायची आहे.

पण वरच बांधायची वरच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ती बांधू शकतात आणि सुपारी घराच्या आतून बांधायची बाहेरून नाही. आतून बंधायची म्हणजे बाहेरून कोणाला ती दिसणार नाही. आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकतात. ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल, आर्थिक स्थिती बळकट होईल, घरात सुख-समृद्धी, शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *