पितृदोषापासून सुटका हवी असेल तर पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी करा हा साधा सोपा उपाय!

अध्यात्मिक

मित्रांनो पितृपक्ष चालू झालेला आहे 29 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोंबर पर्यंत हा पितृपक्ष असणार आहेत पूरण काळानुसार पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पृथ्वीवर भेटायला येतात असे म्हणणे आहेत आणि श्राद्ध केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद देखील देतात असे देखील म्हटले जाते.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये पितृपक्षाच्या काळाला विशेष महत्त्व दिले गेलेला आहे पंधरा दिवसाचा हा विशेष कालावधी पीतरांना समर्पित केलेला आहे पितृपक्षात पीतरांसाठी स्नान दान तर्पण आणि श्राद्धविधी केले जातात पितृपक्षा दरम्यान पूर्वजांचे आभार देखील मानले जातात त्यांच्या बद्दल आदर व्यक्त केला जातो पीत्रांचे भक्तिभावाने श्राद्ध केल्याने त्यांची पिंडदान व तर्पण होते.

पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृ पक्षाचा काळही उत्तम आहे. अशा वेळी काही उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याबद्दल जाणून घ्या. पितृपक्षामध्ये नेमके काय केल्याने आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो व आपल्याला त्या काळामध्ये कोणते काम करायला लागणार आहेत याबाबतची माहिती चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी खूप चांगला मानला जातो पितृपक्षा दरम्यान श्रद्धांजली किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तीच्या हस्ते तुम्हाला करायचे आहे यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आशीर्वाद देखील देतात.

पितरांच्या मृत्यूची तिथी माहिती असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध देखील घालायचे आहे. किंवा पिंडदान करायचे आहे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान देखील करू शकता हे देखील पूर्ण परिणाम देणारे असते.

पितृदूषापासून तुम्हाला मुक्ती मिळवायचे असेल तर पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला भुकेलेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्यायचे आहे त्याचबरोबर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बली ला चोला अर्पण करायचा आहे प्राणी आणि पक्षांसाठी अण्णांनी पाण्याची देखील तुम्हाला सोय करायची आहे मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा देखील तुम्हाला करायची आहे.

पितृपक्षामध्ये दररोज पिठाचे गोळे करून माशांना खायला द्यायचे आहेत कोणतेही शुभ कार्य करायच्या अगोदर पूर्वजांचे स्मरण करायला तुम्ही विसरायचे नाही तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर कधीच करू नका त्यांना यथाशक्ती जेवढे होईल तेवढे दान करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *