पूजा करताना अगरबत्ती ओवाळण्याचे फायदे काय? या गोष्टींची घ्या काळजी!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपले हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण, उत्सव अगदी उत्साहाने साजरे करतात. अनेक सणांमध्ये आपण उपवास देखील करीत असतो. अनेक प्रकारचे व्रत देखील आपल्या हिंदू धर्मांमध्ये सांगितलेले आहेत. बरेच जण असे व्रत करतात. अगदी मनोभावे पूजा करीत असतात. कारण देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर तसेच आपल्या कुटुंबीयांवर राहावा. अशी प्रार्थना देखील ते करीत असतात.

तर मित्रांनो या देवी देवतांच्या पूजेमध्ये आपण विविध प्रकारचे साहित्य वापरतो. जसे की अगरबत्ती, धूप, दिवे, कापूर असे अनेक साहित्य आपण वापरतो.

तर आपण देवी देवतांच्या पूजेमध्ये सर्वच जण अगरबत्ती ओवाळीत असतात. तर मित्रांनो अगरबत्ती ओवाळल्याने नेमके कोणते फायदे आपल्याला होतात हे आपल्याला माहीत नसते. तर मित्रांनो अगरबत्ती ओवाळल्याने नेमके कोणते फायदे आपल्याला होणार आहेत याविषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो आपण आपल्या देवपूजेमध्ये अगरबत्ती जर ओवाळली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यास मदत होते. पण मित्रांनो अगरबत्ती जाळण्यासाठी वास्तुशास्त्रात विशेष नियम सांगितले आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, देवपूजेच्या वेळी अगरबत्ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही देवी देवतेची पूजा करताना अगरबत्ती जाळणे खूपच शुभ असते. पूजा करताना अगरबत्तीच्या वासाने घरातील वातावरण शुद्ध होते. अगरबत्ती लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. मित्रांनो तुम्ही व्रत किंवा उपवास केल्यानंतर देवी देवतांची विधिवत पूजा देखील करतात आणि जर त्यावेळेस तुम्ही अगरबत्ती ओवाळता.

त्यावेळेस आपले देव देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपणाला देतात. म्हणजेच आपल्या कुटुंबीयांवर तसेच आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद कायम राहतो. तसेच मित्रांनो अगरबत्ती हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्यामुळे अगरबत्ती जाळणे खूपच शुभ असते. अगरबत्तीमधून निघणारा धूर हवेत असलेला खराब बॅक्टेरियादेखील नष्ट करतो.

ज्यामुळे आपल्या आरोग्यासाठी देखील त्याचा फायदा होतो. तसेच मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला अगरबत्ती लावलात तर तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते.

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती लावतात. मित्रांनो बांबूच्या अगरबत्ती लावणे हे अशुभ मानले गेलेले आहे. बांबूचे झाड हे शुभ असते. बांबूच्या लाकडाचा वापर आपण लग्नासारख्या कार्यक्रमात मंडप बनवण्यासाठी वापरतो. बांबूच्या लाकडापासून अगरबत्ती देखील बनवल्या जातात.

परंतु मित्रांनो बांबूच्या लाकडापासून बनवलेल्या या अगरबत्ती जाळणे अशुभ मानले गेलेले आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार बांबूचे लाकूड जाळल्याने संतती वाढत नाही. तसेच यामुळे पितृदोष देखील निर्माण होतो. त्यामुळे आपणाला तसेच आपल्या कुटुंबीयांना जो काही आशीर्वाद मिळणार असतो तो आशीर्वाद आपणाला मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो बांबूच्या लाकडापासून बनवलेल्या अगरबत्ती अजिबात तुम्ही जाळू नका.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपणाला अगरबत्ती जाळल्याने वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या देवपूजेमध्ये तसेच व्रत, उपवास केल्यानंतर देवपूजा करताना अगरबत्तीचा वापर नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *