पुढील 23 दिवस “या” राशींचे नशीब सोन्याहून चमकणार

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपले स्वभाव आपले राहणीमान किंवा करिअर याबाबतची माहिती दिली जाते ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्याबद्दलची संपुर्ण माहिती दिली जाते.आजपासून २३ दिवसांसाठी शुक्र ग्रह सिंह राशी मध्ये प्रवेश करणार आहे.

शुक्राच्या आगमनामुळे मंगळ आणि शुक्र एकत्र येणार आहेत. त्याचंबरोबर शुक्र २३ दिवस याच राशीत राहणार आहे. या राशीच्या बदलामुळे काही राशींचे नशीब बदलणार आहे तर त्या कोणत्या राशी आहे चला तर मग आता आपण जाणून घ्या.

पहिली रास आहे ती म्हणजे तूळ रास :-

तूळ राशींच्या लोकांसाठी शुक्र हा लग्न आणि आठव्या स्थानी असलेला चा कारक ग्रह मानला गेलेला आहे लग्नाचा कारक असल्यामुळे नेहमी शुभ संकेत देत असतो सिंह राशीमध्ये गोचर केल्यानंतर शुक्र लाभाच्या स्थानी राहणार आहे त्यामुळे आर्थिक कार्यात देखील सकारात्मक बदल घडून येणार आहेत त्याचबरोबर सकारात्मक विचारात देखील वाढ होण्याची शक्यता दिसून येते त्याचबरोबर व्यवसायात नफा देखील होणार आहे व व्यवसायामध्ये सकारात्मक विचार तुम्हाला ठेवायचे आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये व व्यवसाय मध्ये हा काळ खूपच अनुकूल असा ठरणार आहे.

दुसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास:-

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र सातव्या आणि व्यय स्थानाचा कारक मानला गेलेला आहे. या काळामध्ये तुम्हाला शुभ संकेत कमी मिळणार आहे. त्याचबरोबर शुक्र दहाव्या स्थानी गोचर करत आहे. घरामध्ये व वाहनांमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येते घरामधील वातावरण हे सकारात्मक राहणार आहे व्यवसाय मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये व प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत या काळामध्ये सोबत असणाऱ्या व्यक्तींबद्दल चे प्रेम देखील वाढणार आहे कलाक्षेत्रांमध्ये तुम्ही तुमचं करिअर देखील करणार आहे. दूरच्या प्रवासासाठी खर्च होण्याची दाट शक्यता दिसून येते तुमची जी काही इच्छा आहे ती या काळामध्ये पूर्ण देखील होऊ शकते.

तिसरी रास आहे ती म्हणजे धनु रास:-

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र हा सहाव्या आणि लाभ स्थानाचा कारक मानला गेलेला आहे. फारसे शुभ परिणाम न मिळण्याची शक्यता आहे. तरीही तो लाभ दायक होऊन भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे लाभ होऊ शकतो. या काळामध्ये तुमचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे व त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा देखील मिळू शकतो . नोकरी व्यवसायात बदल होऊ शकतो. तुम्हाला कामामध्ये नशिबाची साथ मिळणारं आहे. तसेच अगदी जवळच्या व्यक्तीकडून तणावाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहू शकतो.

चौथी रास आहे ती म्हणजे मकर रास:-

मकर राशी असलेल्या लोकांसाठी शुक्र दहाव्या आणि पाचव्या स्थानाचा कारक मानला गेलेला आहे.अंतिम राजयोग कारक आहेत. या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये शुभ परिणाम मिळणार आहे. शुक्र सिंह राशीच्या आठव्या स्थानी गोचर करत आहे, ज्यामुळे कौटुंबिक कार्यात वाढ होऊ शकतो. मात्र पोट आणि पायांचा त्रास वाढू शकतो. तसेच कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो.

पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभ रास:-

कुंभ राशीसाठी शुक्र हा भाग्याचा आणि सुखाचा कारक मानला गेलेला आहे. हा काळ सर्वात शुभ परिणाम देऊ शकतो. सिंह राशीत शुक्र गोचर करताच तुम्हाला अनेक शुभ परिणाम देऊ शकतो. त्यामुळे या काळात भागीदारीच्या कामांमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला नशीबाची साथ मिळण्याची दाट शक्यता आहे. वडिलांचा सहवास लाभू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते.

सहावी रास आहे ती म्हणजे मीन रास:-

मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह पराक्रम आणि आठव्या स्थानी कारक मानला गेलेला आहे. तो शुभ फल देण्याची शक्यता कमी आहे. सिंह राशीत गोचर करताना शुक्र रोग आणि शत्रूंमध्ये गोचर करेल. ज्यामुळे तुमचे अंतर्गत रोग आणि शत्रू वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळचा मित्र तणावाची परिस्थिती निर्माण करू शकतो. त्वचेच्या ऍलर्जीची समस्या देखील उत्पन्न होऊ शकतात. प्रवास खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *