सकाळी उठल्यावर ‘या’ पाच गोष्टी कराच.

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्या दिवसाची सुरुवात ही चांगली झाली पाहिजे कारण जर सकाळच आपली चांगली झाली तर आपला पूर्ण दिवसच खूप चांगला जातो त्यासाठी आपण दररोज सकाळी उठल्या उठल्या एकदम फ्रेश वातावरण बघितलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला लवकर सकाळी उठायला पाहिजे.

सकाळी लवकर उठून आपण आपल्या दोन्ही हातांकडे पहिल्यांदा बघायचा आहे व आपला दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवून घ्यायचा आहे सर्वात आपण सकाळी जर उठल्याउठल्या मोबाईल बघत असाल तरी सवय आपल्याला आत्ताच बंद करायचे आहे कारण कधीही उठल्या उठल्या मोबाईलला हात लावायचा नाही.

तर मित्रांनो सकाळी उठल्यानंतर पाच गोष्टी कोणत्या करायच्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो एक भाग्यवान गोष्ट आहे ती म्हणजे जे तुम्ही रात्री झोपताना डोळे बंद करून झोपला होता ते सकाळी तुम्ही उठला आहे खूप नशीबवान आहे नाही.

तर एकेकांना रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ कधी कधी पाहायला देखील मिळत नाही.  तर तुम्हाला यापासून एक नवीन संधी मिळाले आहे तर त्यातली संधी आहे ती म्हणजे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी पुढचा दिवस बघण्याची व आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घडवून आणण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे

मित्रांनो तुम्हाला या पाच गोष्टी करायचे आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही कधीही मोबाईल लॅपटॉप नोटबुक अशा वस्तूंना हात लावायची नाही दिवसाची सुरुवात ही तुम्हाला प्रसन्नतेने करायचे आहे म्हणजेच की सकारात्मकतेने तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे .

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल लॅपटॉप सर्व वस्तू घेऊन बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःला दिवसभरासाठी चार्ज करून घ्या म्हणजेच की सूर्याच्या प्रकरतेच कोवळ्या सूर्याचं तेज तुम्ही घ्या कारण त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये असते. तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे याच्यामध्ये तुम्ही समाधान देखील राहायला शिकायचा आहे कारण जे तुमच्याकडे आहे ते अनेक कित्येक जणांच्या नशिबात देखील नाही.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभर काय करायचे आहे हे ठरवण्याआधी स्वतःला एक आव्हान स्वीकारायला सज्ज तर व्हायचं आहे कारण आपण जे ठरवतो ते कधीही होत नाही आपण जर चांगले असलो आपला आरोग्य चांगलं असेल तर आपण कोणतेही कामे सहज पटकन करू शकतो प्रयत्न केल्याने सर्व गोष्टी प्राप्त होतात आपण फक्त कष्टाने प्रयत्नाने सर्व कामे करत राहायचे आहे.

चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्वतःला आत्मविश्वास द्यायचा आहे की मी कोणत्याही काम करायचं झालं की ते मी पूर्ण करणारच जर तुम्हाला जगाने कमी उच्चारलं म्हणजेच की तुला काही येत नाही. तर पहिला स्वतःवर आत्मविश्वासावर ठाम राहायचं आहेकी मी कोणत्याही गोष्टींमध्ये पुढे जाणार.

कोणत्याही कामांमध्ये आपल्या वतीने शंभर टक्के प्रयत्न करायची आपल्यामध्ये तयारी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाही त्या गोष्टींचा आपण विचार करायचा नाही मात्र आपण प्रयत्न न करता आपल्या स्वीकारलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहणार नाही .

आपण जर प्रयत्न करून अपयश आलो तर ते अपयश आपण पचवण्याची तयारी देखील ठेवली पाहिजे पण आपण प्रयत्न न करताच अपयश पचवलं तर ते अपयश म्हटलं जात नाही. एकावेळी अनेक कामे करायचा विचार करू नका एकावेळी एकच काम करा आणि ते पण पूर्ण मेहनतीने कष्टाने आणि मनाने इच्छेने पूर्ण करा त्याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के तुम्ही द्या त्याच्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे.

पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कोणतेही काम करताना तुम्हाला लक्षपूर्वक करायचे आहे त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला आनंद देखील देतात पडत्या काळामध्ये इतरांना नेहमी मदत करावी जसं आपल्याला कधी ना कधी कोणाची गरज लागते तसेच इतरांना देखील गरज लागत असते.

कधी कोणाच्या परिस्थितीवर हसू नये एखादा जर टेन्शनमध्ये असेल जास्त त्रासलेला असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे. आपण नेहमी दुसऱ्यांची अडचण समजून घेतली पाहिजे यथाशक्ती आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आपण करायची आहे मनामध्ये वैरभाव किंवा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता समोरच्याची आपल्याला नातं ठेवायचं आहे.

आपल्याला समोरच्याकडून काही फायदा होईल याच्यासाठी आपल्याला कधीही नातं टिकवायचं नाही तसं जर तुम्ही नातं जोडला तर ते जास्त काय टिकत देखील नाही तर मित्रांनो या पाच गोष्टी आहेत आणि या तुम्हाला करायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *