संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या ‘या’ उपायांनी मिळेल श्रीगणेशाचा आशीर्वाद !

राशिभविष्य अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्यापैकी बरेचजण हे अनेक देवीदेवतांचे उपवास, व्रत करीत असतात. आपल्या मनोकामना तसेच आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्यात ही प्रार्थना देखील ते करीत असतात. मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण हे श्री गणेशांचे अगदी नित्यनेमाने तसेच मनोभावे पूजा तसेच व्रत देखील करीत असतात. गणपतींना विघ्नहर्ता असे देखील आपण मानतो. म्हणजेच आपल्या जीवनातील आलेल्या प्रत्येक अडचणीतून आपणाला श्री गणेशजी मार्ग दाखवीत असतात.

मित्रांनो श्री गणेशांचा कृपाआशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी तसेच आपल्या सर्व अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक व्रत करतो. तसेच पूजा व्रतवैकल्ये करत असतो. तर मित्रांनो तुम्हाला देखील श्री गणेशांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला मी एक आज उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे.

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती हे व्रत पाळतो त्याला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामनाही श्रीगणेश पूर्ण करतात. कारण भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे दाता आहे.

मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला नेमके कोणते उपाय करायचे आहे. जेणेकरून या उपायांनी श्री गणेशांचा कृपाशीर्वाद आपणाला प्राप्त होईल.

मित्रांनो चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर जे आपले पुजास्थान आहे त्या पूजास्थानाची स्वच्छता केल्यानंतर गंगेचे पाणी शिंपडावे. त्यामुळे ती जागा पवित्र होईल. त्यानंतर आपल्याला
विधीपूर्वक गणेशाची पूजा करायची आहे. तसेच गणेशजी यांना फळे आणि लाडू अर्पण करा. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी नेमके कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. तर मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दोन्ही हातांनी लाल फुले अर्पण करावित. पुष्प अर्पण करताना ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने घरात सुख-शांती राहते.

तसेच मित्रांनो संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी आठ मुखी रुद्राक्षाची विधिवत पूजा करून गळ्यात हार घाला. असे केल्याने नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता वाढते. संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला रोळी आणि चंदनाचा तिलक लावावा.

तसेच गणेशाच्या मंत्राचा 11 वेळा जप करावा.तो मत्र काहीसा असा आहे ‘वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी सम्प्रभ: निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा…’
त्या मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे असे केल्याने आपल्या प्रत्येक मनोकामना ही पूर्ण मदत होते.

तर मित्रांनो तुम्हाला देखील श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *