सर्वपित्री अमावस्या कधी आहे? मुहूर्त आणि महत्व, नक्की हे करा

अध्यात्मिक

मित्रांनो पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि 14 ऑक्टोंबर पर्यंत पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असणार आहे आणि या पितृपक्षांमध्ये आपण अनेक प्रकारचे उपाय करीत असतो. तसेच मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा कृपाशीर्वाद आपणाला सदैव राहावा यासाठी श्राद्ध देखील या पितृपक्षांमध्ये घातले जाते. पितृपक्षाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि प्रकारचे दान देखील पितृपक्षांमध्ये केले जाते.

तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वपित्री अमावस्येला अतिशय शुभ मानले जाते. म्हणजेच या सर्वपित्री अमावस्येला काही आपण विधी केले तर ते आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. तर यावेळी सर्वपित्री अमावस्या कधी आहे? आणि मुहूर्त कोणता? आपण जाणून घेऊयात.

अश्विन महिन्यात सर्वपित्री अमावस्या येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते. यावेळी सर्व पितृ अमावस्या शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी आहे. अमावस्या तिथी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ५१ मिनिटांनी सुरू होत आहे
अमावस्या तिथी शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील.

शास्त्रानुसार पितृ म्हणजेच सर्वपित्री अमावस्या तिथीला श्राद्धपक्ष तसेच पितृपक्ष समाप्त होतो. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांच्या नावाने केले जाते. ही अमावस्या पितरांचे स्मरण करण्यासाठी तसेच दान करण्यासाठी, शांतीची प्रार्थना करण्यासाठी खूपच महत्त्वाची मानली जाते.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे घालायची आहेत आणि यानंतर तुम्ही आपल्या पितरांचे स्मरण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्यांचे श्राद्ध करायचे आहे.

तसेच तुम्ही अमावस्येच्या दिवशी खीर पुरी आणि भाजी आपल्या घरामध्ये बनवायची आहे आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना तुम्ही जेवण करून घ्या अशी प्रार्थना देखील करायची आहे.

तसेच जर तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान किंवा त्यांना दक्षिणा दान द्यायचे आहे. यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपणाला नक्कीच प्राप्त होतो. ब्राह्मणाला जेवण या दिवशी अवश्य द्यावे आणि ब्राह्मणांचे जेवण झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करायचे आहे.

भोजन झाल्यानंतर पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. तसेच तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कावळा, गाय आणि कुत्र्याला अन्नदान करायचे आहे. तसेच तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद नक्कीच आपणाला प्राप्त होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *