शनीदेव होतात अशा लोकांवर प्रसन्न! जे करतात ‘या’ गोष्टींचे दान

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. तसेच आपणाला अनेक संकटातून तसेच दुःखातून मुक्ती देखील मिळते. असे मानले जाते की जो व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय दान करतो त्याला जीवनामध्ये शुभ फळे प्राप्त होतात.

तसेच ज्योतिष शास्त्रानुसार गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने शनिदेव देखील प्रसन्न होतात. त्यासोबत साडेसाती आणि अनेक अडचणीच्या प्रकोपपासून त्या व्यक्तीची सुटका देखील होते. तर आज मी तुम्हाला जो व्यक्ती या गोष्टींचे दान करतो त्यांच्यावर शनिदेव कृपादृष्टी ठेवतात तर या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊयात.

तर तुम्हाला जर शनि देवाची कृपा प्राप्त करायची असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार महिलांसाठी भांगेत भरण्याचे कुंकू फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. भांगेत भरण्याचे कुंकू दिल्यास पतीवर येणारे संकट दूर होते. यामुळे प्रतीची प्रगती देखील होत राहते. ज्योतिष शास्त्रानुसार बूट आणि चप्पल यांचा संबंध शनि देवाशी सांगितलेला आहे.

म्हणजेच शनीचा दोष पायांवरून उठतो. अशा स्थितीमध्ये शनिवारी काळ्या रंगाचे बूट किंवा चप्पल दान करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. यामुळे आपणाला शुभ परिणाम देखील मिळतात. तसेच शनीदोषांपासून आपल्याला मुक्ती देखील मिळते.. वैदिक ज्योतिषानुसार शनिदेवाचा संबंध छत्रीशीही सांगितला जातो.

जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला छत्री दान केली तर हे खूपच महान दान मानले जाते. श्राद्धात ब्राह्मणांना छत्री अर्पण करावे असे सांगितले जाते. सनातन धर्मात गाय दान करणे हे श्रेष्ठ मानले जाते. गोदान हे अनेक जन्म आणि अनेक पिढ्यांसाठी हितकारक असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सुख, संपत्ती हवी असेल तर त्याने गाय दान करावी.

हिंदू धर्मातही धान्य दानाला खूप महत्त्व आहे. धान्य दान केल्याने आई लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघीही प्रसन्न होतात. निर्धाराने धान्य दान केल्यास इच्छित फळ मिळते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *