शास्त्रानुसार चुकूनही या वेळेस देवपूजा करू नये..

अध्यात्म माहिती

आपण घरातल्या देवांची रोज पूजा करतो. पण काही वेळा काही प्रसंग असे असतात की, ज्यामध्ये देवपूजा करू नका! म्हणून सांगितले जातात. मग नक्की कधी कधी देवपूजा करू नये? चला जाणून घेऊ..

देवपूजा बाबत आपल्या धर्मशास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत. त्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दुपारच्या वेळेस पुजा करणे वर्ज्य मानले जाते, दुपारची वेळ म्हणजे साधारण 1 ते 4 वाजेच्या दरम्यान पूजा करू नये असं सांगितलं जातं. याशिवाय देव पूजा आणि आरती यातही स्पष्टता असावी.

म्हणजे पूजेच्या वेळेस पुजा आणि आरतीच्या वेळेस आरती करावी. आता सगळ्यात महत्वाचं घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर देवपूजा करणे टाळावे आणि कारण सुतकाच्या काळात देवपूजा निषिद्ध मानली जाते. या काळात आपल्या नातेवाईकांनी सुद्धा देवपूजा करू नये असं सांगितलं जातं.

सुतक कालावधी पूर्ण झाल्यावर घरची शुद्धी करून देवपूजेला पुन्हा केली जाते. घरात बाळ जन्माला आला ते नवीन बाळाचा जन्म घरामध्ये झाला असेल तर वृद्धी लागते. तर वृद्धीच्या काळात सुद्धा पूजा करू नये असं सांगितलं जात. महिलांच्या मासिक धर्माच्या काळातही पूजा करू नये, असं सांगितलं जात.

स्त्रियांना निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे मासिक धर्म होय. मासिक धर्माच्या वेळेस देवपूजा मात्र करू नये, असं शास्त्र सांगतं. या काळातही स्त्री आपल्या कठीण काळातून जात असते त्यामुळे या कालावधीमध्ये स्त्रीने आराम करणं अपेक्षित असतं. त्यामुळे देवधर्म नाही तर इतर कामात सुद्धा करू नये. कारण निसर्गाने दिलेली ही त्यांची ही हक्काची सुट्टी असते असं म्हणायला हवं.

आता घरातील स्त्री रजस्वला असल्यास तिचा वावर नसलेल्या खोलीत देव असतील तर घरातील वडीलधाऱ्या पुरुषाने अंघोळ करून पूजा करावी. पण जागेच्या अभावी ठेवणे शक्य नसल्यास 4 दिवस काळ समाप्त होईपर्यंत देवघर पडद्याने झाकून ठेवावे. विशिष्ट कारणासाठी अशाप्रकारे देवाला झाकून ठेवण गैर नसते.

रात्रीच्या वेळी सर्व प्रकारचे धार्मिक पुजा वेदांनी निषिद्ध मानले आहेत. फक्त दिवाळी, होळी, करवा चौथ अशा विशेष पौर्णिमा आणि अमावस्या आहेत त्या दिवशी मात्र रात्री पूजा सिद्ध मानली जाते. या काही खास आणि विशेष पौर्णिमा आणि अमावस्या सोडल्या तर इतर वेळी रात्री पूजा करू नये. आरतीनंतर देवाताविश्रांती घेण्यास जातात आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी पूजा करू नये.

मित्रांनो असं जरी असलं तरी मानसिक पूजा करण्याला शास्त्रामध्ये कोणत्याही काळात निषिद्ध मानलं गेलेलं नाही. मानसिक पूजा म्हणजे तुम्ही ईश्वराचे स्मरण, नामस्मरण चिंतन-मनन हे कधी करू शकता यासाठी कोणत्याही वेळेच बंधन नसतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला ईश्‍वराची आठवण होईल तेव्हा तेव्हा तुम्ही ईश्वराचे स्मरण मनन चिंतन करू शकता…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *