शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातुन दूध का अर्पण करू नये?

अध्यात्म माहिती

श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी जो भक्त भगवान महादेवाची पूजा करतो आणि विधीनुसार व्रत करतो त्यांच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. कारण श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून भगवान शंकराची पूजा केली जाते. त्यानंतर शिवलिंगावर दूध, भांग अश्या अनेक वस्तू अर्पण केल्या जातात.

शास्त्रानुसार दूध हे सात्विक मानले जात. मान्यता आहे की, शिवलिंगावर दूध चढवल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सोमवारी दुधाचा दान केल्याने चंद्रमा मजबूत होतो. भगवान शिवाच्या रुद्राभिषेकासाठी दुधाचा विशेष प्रयोग केला तर त्यापासून सुद्धा अनेक फळ प्राप्त होतात. श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास ठेवत असतात,

याबरोबरच श्रावण महिन्यात भगवान प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का कि, भगवान शंकरावर दूध का चढवलं जातं? आणि शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून दूध वाहावे की नाही? या प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया..

दूध वाहण्याची परंपरा सागर मंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार सर्वात समुद्र मंथनातून सर्वात पहिलं हलाहल विष निघालं होतं त्या विषाच्या दाहगतेने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली, देवतांची प्रार्थना ऐकून भगवान महादेवांन त्या विषाला तळ हातावर ठेवलं आणि विषपान केलं पण त्यांनी त्याच्या ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही,

त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ म्हणून ओळखला जाऊ लागला. या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्यात जटांमधील देवी गंगेवर होऊ लागला. विषच्या दहाला कमी करण्यासाठी देवतांनी शिवाला दूध ग्रहण केला.

भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव कमी होवू लागला. तेव्हापासून शिवलिंगावर दूध वाहण्याची परंपरा सुरू झाली, असं सांगितल्याचं जातं. आता महादेवांना अभिषेक करताना कलशामधून अभिषेक करावा. मात्र, जलाभिषेक करतेवेळी चुकूनही शंख वापरू नये.

असं म्हणतात की, त्याच प्रमाणे महादेवांना दुधाने अभिषेक करताना तांब्याच्या भांड्यात अभिषेक करू नये किंवा तांब्याच्या भांड्यात दूध त्यांना तेव्हा वाहु नये असे मानतात, यामागे काय कारण चला तर जाणून घेऊ.. कारण तांब्याच्या भांड्यात दही किंवा पाण्याशिवाय दुग्धजन्य पदार्थ ठेवून हानिकारक मानलं जातं. तांब दुधात असलेल्या खनिज आणि तत्वावर प्रतिक्रिया देतो त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.

आणि आधी सांगितल्याप्रमाणेच विषाच्या दहाला कमी करण्यासाठी देवांनी भगवान महादेवांना दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला. तर मग तांब्याच्या भांड्यात दूध असल्यावर जे विष बाधा निर्माण होते अस दूध जर आपण महादेवांना वाहिले तर ते अधिक उग्र होण्याची शक्यता असते, म्हणून महादेवाला तांब्याच्या भांड्यात जलाभिषेक करावा मात्र दुधाचा अभिषेक करू नये.

शिवाय चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध कधी ठेवू नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध हे विषारी बनत. तुम्हीसुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध पिलात तर आपल्याला सुद्धा अन्न विषबाधा होण्याची शक्यता असते. याचबरोबर शिवलिंगावर अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टींचे सेवन करू नये, असं सांगितलं जातं.

तर तुम्हीसुद्धा शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यात दूध वाहत असाल तर ते थांबावा. तांब्याच्या भांड्यात नेहमी शिवलिंगावर जलाभिषेक करावा तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा असेल तर तो अन्य पात्रातून करावा असं सांगितलं जातं..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *