श्रावणात शिवामूठ वाहण्याचे मुख्य कारण काय??

अध्यात्मिक माहिती

आषाढी एकादशी नंतर चातुर्मासाचा सातवीक काळ सुरू होतो. चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्व आधी लागता तो श्रावण महिना आणि श्रावण महिना म्हटलं की, सहज आठवतात त्या बालकवींच्या कवितेची ओळी, “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती..”

इतकं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण श्रावणामध्ये असतं. धार्मिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यात अनेक पूजा केल्या जातात. त्यात अनेक पूजन पैकी एका पूजेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक मुलीला वाटतं की, आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावं.

सासरच्या माणसांची माया आपल्याला मिळावी. सासरच्यांना सुद्धा आपल्या बद्दल आपुलकी वाटावी. नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची असते. कारण ती स्वतःचे घर सोडून एका अनोळखी घरामध्ये आलेली असते, त्यामुळे अशा अनोळखी वातावरणामध्ये एक भावनिक बंध दृढ नातं निर्माण होण्याची आवश्यकता असते

आणि त्यासाठीच आपल्या पूर्वजांनी श्रावण सोमवारी शिवामूठ वाहण्याच व्रत सांगितले आहे. त्यामुळे शिवामूठ हा एक प्रकारचा वसा आहे. हा वसा घेतल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसांची आवडती होते अशी मान्यता आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवा मुठीचे महत्व ही वेगळे आहे.

यामध्ये पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वापरण्याची पद्धत आहे. पाचवा श्रावणी सोमवार आल्यास शिवमूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे. मात्र, त्याची पूजा कशी करावी.

यासाठी श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. संकल्प करावा आणि मग त्यानंतर भगवान शिवशंकरांचे ध्यान करावे. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा-शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरे दिरा भावा नावडतीची आवडती कर रे देवा”, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.

या दिवशी शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेल पत्र व्हावे. ही शिवा मूठ वाहने श्रावणातला मोठा वसा मानला जातो. त्यामुळे ती प्रत्येक महिलेने असंही सांगितलं जातं. खरं लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्ष ही शिवामूठ वाहिली जाते आणि त्यानंतर उद्यापन केले जाते. पण काही कारणाने उद्यापण करायला जमले नाही

तर उद्यापण होईपर्यंत शिवामूठ व्हावी असेही सांगण्यात येते. तसेच आपल्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोचपणा आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो. तो देखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो? तो अशा व्रतं मधून अनुभवता येतं.

दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो किंवा अन्न असो. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यं मधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे चालणारी शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी.

शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना देण्यात यावी. प्रत्येक पूजेचे मागे असलेली भावना महत्त्वाची, कारण शेवटी भाव तिथे देव असे म्हंटले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *