श्रावणात या उपायांने सर्व चिंता होतील दूर..

अध्यात्मिक माहिती

कोणत्याही मानसिक त्रासाला तुम्ही सामोरे जात आहे का? कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नाही आहे का? तुमच्या सोबत हेच होत असल्यास श्रावण महिन्यात हे उपाय नक्की करून पहा. त्यामुळे मानसिक दडपणातून बाहेर येण्यास नक्कीच मदत होईल. कारण असे म्हणतात की,

आपल्या कार्याला अध्यात्माची जोड मिळाली तर सर्व कार्य पुर्ण होवू लागतात आणि हे संधी तुम्हाला या श्रावण महिन्यात चालून आलेली आहे. कारण श्रावण महिन्याला शिवप्रिया म्हटले गेले आहे. देवांचे देव महादेव यांचाही हा सण सर्व भक्तांना ही प्रिय असाच आहे.

मात्र, कोणत्याही मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागत असल्यास श्रावणात या ज्योतिषी उपाय तुम्ही नक्की करून पहावेत. चला तर मग कोणते उपाय तणावमुक्तीसाठी किंवा दडपणातून मुक्त होण्यासाठी केले जाऊ शकतात हे जाणून घेऊयात..

भगवान महादेवांचे श्रावण महिन्यात विशेष पूजा केली जाते. या महिन्यात भगवान शिवाची उपासना आणि मनापासून काही उपाय नक्की करून घ्यावे. त्यामुळे जीवनातील पैशाच्या सुद्धा सर्व समस्या दूर होऊ लागतात आणि त्यामुळे मनासारखे कार्य घडू लागतात. त्या बरोबर आहे मानसिक दडपणातून सुद्धा मुक्त होऊ लागते.

आता मानसिक दडपणातून मुक्ती हवी असल्यास काय करावं? तर कोणत्याही प्रकारचे चिंता असल्यास त्या चिंतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून पाणी, लालचंदन, अक्षता, लाल फुले अर्पण करावेत. तुमच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.

याबरोबरच रोज भगवान हनुमानाची पूजा करावी आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावा. एखाद्या गरीब व्यक्तीला चपलीची जोडी दान करावी. याबरोबरच भीती, चिंता आणि मानसिक त्रास दूर करण्यासाठी एक उपाय नक्की करू पाहा.

झोपेच्या खोलीमध्ये कापुराचा दिवा लावावा. जर घरामध्ये कापूर दिवा नसेल तर कोणत्याही दिव्यात किंवा भांड्यात कापूर लावावा. यामुळे सर्व विघ्ने दूर होते. याबरोबरच सर्व प्रकारच्या अडचणीमधून मुक्ती मिळते आणि परिस्थिती सुद्धा अनुकूल होण्यास मदत होते.
जर तुम्ही कोणत्याही कारणाने मानसिक तणावाखाली असाल किंवा कोणत्याही अज्ञात भीतीने त्रस्त असाल.

किंवा असुरक्षित वाटत असेल तर श्रावण महिन्यात बुधवारी निळ्या कपड्यात गुंडाळलेली एक नारळ गरजूला दान करावे. तनावासोबतसतत उदास असल्यासारखंच वाटत असेल तर सोमवारी आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्र देवाचा दर्शन घेतल्यानंतर “ओम पुत्र सोमय्या ये नमः”

या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्याबरोबरच तांदूळ घेवून साखर, मिठाई, चंदन, साखर, चांदी यांसारख्या वस्तू दान कराव्यात. यामुळेसुद्धा अनेक पटींनी लाभ मिळतो असं सांगितलं जातं. तर श्रावणात केलेला या उपायने नक्कीच तुम्हाला मानसिक तणावातून दडपणातून आणि आर्थिक जाचातून सुटका होण्यास नक्कीच मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *