श्रावण सोमवारी बेलपत्राला हे लावून शिवलिंगावर अर्पण करा, महादेव होतील प्रसन्न!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि श्रावण महिना हा खूपच पवित्र महिना मानला जातो. अनेक पूजाविधी, व्रत, उपवास हे श्रावण महिन्यामध्ये केले जातात. तर यावर्षी दोन महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. म्हणजेच आता 18 जुलैला जो चालू झालेला श्रावण आहे

हा अधिक श्रावण असणार आहे आणि तो 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे आणि 16 ऑगस्टला जो चालू होणार आहे तो नीज श्रावण असणार आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारचे उपवास करतो. महादेवांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा तसेच भगवान शंकर हे आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी आपण श्रावण सोमवारचे व्रत हे करीतच असतो.

तर मी तुम्हाला आज असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण सोमवारी केला तर यामुळे तुमच्यावर महादेव नक्कीच प्रसन्न होणार आहेत. तर तुम्ही कोणत्याही श्रावण सोमवारी हा बेलपत्राचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने भोलेनाथांवर विश्वास ठेवून जर केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी संकटे भगवान शंकर दूर करतील

आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या देखील नक्कीच पूर्ण होणार आहेत. तर प्रत्येक जण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर बेलपत्राचे पान हे अर्पण करीत असतात. कारण बेलपत्र हे शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे शंकर देखील आपणावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपणाला प्राप्त होतो. तर हा उपाय करत असताना आपल्याला एक किंवा दोन बेलपत्राच्या पानांची आवश्यकता आहे.

तर तुम्ही सोमवारच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून देवघरामधील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीला किंवा जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे आणि हा अभिषेक तुम्हाला पंचामृतानेच घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

जर तुमच्या घरामध्ये शंकराची मूर्ती नसेल, शिवलिंग नसेल तर अशावेळी तुम्ही घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे हा उपाय केला तरीही चालेल . तर तुम्हाला जे आपण बेलपत्र घेतलेल आहे त्या बेलपत्राला दोन गोष्टी लावायच्या आहेत आणि नंतर मग ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. तर मित्रांनो एक बेलपत्र घ्यायच आहे आणि त्या बेलपत्रावर तुम्हाला चंदनाचा टिळक आणि एक मधाचा टिळक लावायचा आहे.

त्या बेलपत्रावरती मधाचा आणि चंदनाचा टिळक लावल्यानंतर तुम्हाला ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही श्रावण सोमवारी हा उपाय करायचा आहे. यामुळे भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या सर्व काही दूर करतील.

तर तुम्ही देखील हा चमत्कारिक उपाय श्रावण सोमवारी आवश्यक आहे. यामुळे तुमच्या सर्व अडीअडचणी नक्कीच दूर होतील. जर तुमच्या घरामध्ये शंकरांची मूर्ती किंवा शिवलिंग नसेल तर तुम्ही घराजवळ असणारे मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालतो. यामुळे तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल आणि शिवशंभो नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *