श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे कसले प्रतीक आहेत?

अध्यात्म माहिती

श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे कसले प्रतीक आहेत?

दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचे वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

गाय
गाय म्हणजे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे.

चार कुत्रे
चार कुत्रे म्हणजे चार वेद- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.

झोळी
दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे- झोळी हे मधुमक्षेचे म्हणजे मधमाशांचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मग गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात. तसेच दत्त दारोदार फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात. दारोदार हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो. म्हणून जोडी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे.

कमांडलू
कमांडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या सोबत असतात. सन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे. कारण कमांडलू हेच त्याचे ऐहिक धन होय.

त्रिशूल
त्रिमूर्ती रूपातील महेशच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भेद आढळतो. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाहीत. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तांकडे मोकळे हात नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *